अंगापुर गावचे जेष्ठ नागरिक आणि आदर्श शिक्षक स्व गजानन पांडुरंग काळे गुरुजी यांचे अल्पशा आजारामुळे दिनांक 29 मार्च रोजी आकस्मित निधन झाले.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाची दखल घेऊन त्याना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.अतिशय तळमळीने काम करणारा एक हाडाचा शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.त्यांनी दीर्घकाळ उत्कृष्ठ केंद्रप्रमुख म्हणून सेवा बजावली होती.अनेक विद्यार्थी घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.त्यांच्या निधनामुळे अंगापूर तसेच परिसरात शोककळा पसरली..त्यांच्या पश्चात दोन मुले ,दोन विवाहित मुली ,चार पुतणे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.




