अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात डॉ. वसंत गोवारीकराचे मोलाचे योगदान-श्रीरंग काटेकर

वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात डॉ. वसंत गोवारीकराचे मोलाचे योगदान-श्रीरंग काटेकर

वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात डॉ. वसंत गोवारीकराचे मोलाचे योगदान-श्रीरंग काटेकर

गौरीशंकर च्या डॉ पी व्ही सुखात्मे स्कूल मध्ये डॉ वसंत गोवारीकर यांची ९३ वी जयंती उत्साहात साजरी

 लिंब-भारत भूमीचे सुपुत्र थोर वैज्ञानिक व आत्मनिर्भरतेचा ध्यास घेऊन वाटचाल करणारे थोर शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांनी भारतीय वैज्ञानिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे असे मत गौरीशंकर चे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले. ते लिंब या जि सातारा येथील गौरीशंकरचे डॉ पी व्ही सुखात्मे इंग्लिश मिडियम स्कूल लिंब येथे शास्त्रज्ञ डॉ वसंत गोवारीकर यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी स्कूलचे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण, नितीन शिवथरे, राकेश खोपडे व शिक्षक वर्ग आदी प्रमुख उपस्थित होते. श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीत भारतीय वैज्ञानिक संशोधन क्षेत्राला नवी उभारी देताना डॉ. वसंत गोवारीकर यांनी स्वदेशी हवामान अंदाज मॉडेल विकसित करून देशांतर्गत विज्ञान क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. अवकाश संशोधन हवामान शास्त्र व लोकसंख्या या क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. यावेळी प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण म्हणाले की स्पर्धेच्या युगात वैज्ञानिक दृष्टिकोन हाच खरा प्रगतीचा मार्ग असून डॉ. वसंत गोवारीकर यांनी भारतीय विज्ञान क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. प्रारंभी थोर शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून भविष्यातील वाटचाल करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार नितीन शिवथरे यांनी केले. 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket