अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » पर्यटन » शेतकऱ्यांना लाभ देताना निकषांचे समान पालन करा- अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

शेतकऱ्यांना लाभ देताना निकषांचे समान पालन करा- अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने 

शेतकऱ्यांना लाभ देताना निकषांचे समान पालन करा- अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने 

सातारा -कृषी विभागाने शेतकऱ्यांना लाभ देताना शासनाने घालून दिलेल्या निकषांचे सर्व तालुक्यांमध्ये समान पद्धतीने पालन करणे बंधनकारक आहे. कोणत्याही पात्र शेतकऱ्याला लाभापासून वंचित ठेवू नये, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

अनेक शेतांमध्ये विद्युत तारा जमिनीलगत किंवा खूप खाली आल्या आहेत. यामुळे जीवितहानी किंवा मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे. महावितरणने तातडीने या तारा उंच करण्याचे काम हाती घ्यावे. शहरातील विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी बंद असलेली सिग्नल यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करावी. गोडोली ते मोळाचा ओढा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.

या बैठकीत ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांनी विविध समस्या मांडल्या यावर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही अप्पर जिल्हाधिकारी श्री. माने यांनी दिले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket