अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधे प्रवेश परीक्षा मार्गदर्शन

यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधे प्रवेश परीक्षा मार्गदर्शन 

यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधे प्रवेश परीक्षा मार्गदर्शन 

सातारा : यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे वास्तुशास्त्र क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल ऍपटीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) २०२६ संदर्भात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, परीक्षेची अचूक माहिती समजावी आणि वास्तुकला क्षेत्रातील संधींबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (COA) मार्फत दरवर्षी घेण्यात येणारी NATA परीक्षा ही देशभरातील बी.आर्क अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. NATA २०२६ परीक्षा एप्रिल ते जून या कालावधीत निवडक शुक्रवार व शनिवारी आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, सातारा येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे, करिअर समुपदेशन, तसेच NATA परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना रेखाटन कौशल्य, तर्कशक्ती, सामान्य बुद्धिमत्ता आणि वास्तुकलेशी संबंधित मूलभूत संकल्पना यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर चे प्राचार्य अर्कि. सुहास तळेकर यांनी सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. NATA ही केवळ परीक्षा नसून सर्जनशीलतेला वाव देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.”

महाविद्यालयाच्या ग्रंथालयात NATA संदर्भातील आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी महाविद्यालयात भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, वास्तुकला क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबद्दल माहिती देण्यासाठी विशेष सत्रेही आयोजित करण्यात येणार आहेत.

या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यासह परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket