अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » मंत्री जयकुमार गोरे पॅटर्न हिट! भाजपाचा साताऱ्यावर कब्जा भाजपाचा साताऱ्यात मोठा पलटवार; जिल्हा परिषदेत सत्ता काबीज

मंत्री जयकुमार गोरे पॅटर्न हिट! भाजपाचा साताऱ्यावर कब्जा भाजपाचा साताऱ्यात मोठा पलटवार; जिल्हा परिषदेत सत्ता काबीज

मंत्री जयकुमार गोरे पॅटर्न हिट! भाजपाचा साताऱ्यावर कब्जा भाजपाचा साताऱ्यात मोठा पलटवार; जिल्हा परिषदेत सत्ता काबीज

सातारा : ६५ सदस्यांच्या सातारा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींमध्ये भाजपाने अखेर बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली. सुरुवातीच्या गणितानुसार भाजपचे २७ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आणि शिवसेनेचे १५ सदस्य असे चित्र होते. त्यात स्वाभिमानीच्या एका सदस्याने राष्ट्रवादीसोबत गटनोंदणी केल्याने राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीचे संख्याबळ ३६ वर गेले होते. त्यामुळे सत्तेची समीकरणे त्यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट दिसत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच आघाडी जाहीर केली होती. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरे तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अशोकराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. दुसरीकडे भाजपकडून अध्यक्षपदासाठी प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदासाठी राजू भोसले यांना रिंगणात उतरवण्यात आले.

मात्र अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी राजकीय समीकरणांना अचानक कलाटणी मिळाली. शिवसेना-राष्ट्रवादीचे ३ सदस्य अनुपस्थित राहिल्याने आघाडीचे गणित बिघडले. याचा थेट फायदा भाजपाला झाला. भाजपाने ३२ सदस्यांचे संख्याबळ दाखवत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद पटकावले, तर आघाडीला केवळ ३१ सदस्यांवर समाधान मानावे लागले.

अटीतटीच्या या लढतीत केवळ एका मताने भाजपाने जिल्हा परिषद सत्ता खेचून आणत विरोधकांना मोठा धक्का दिला. या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने रणनीती आखत निर्णायक विजय मिळवला.

सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या या सत्तांतरामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंदआबा पाटील यांना हा पराभव मात्र जिव्हारी लागला आहे. अध्यक्षपदाच्या गणितात अंदाज चुकल्याने भाजपने आयती संधी साधत आपले उमेदवार निवडून आणले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket