अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महानगरपालिकांनाही प्लास्टिक फुलांच्या बाजारावर कारवाईचे अधिकार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानगरपालिकांनाही प्लास्टिक फुलांच्या बाजारावर कारवाईचे अधिकार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानगरपालिकांनाही प्लास्टिक फुलांच्या बाजारावर कारवाईचे अधिकार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· प्लास्टिक फुलांच्या बंदीसाठी विशेष सूचना काढणार 

मुंबई, दि. १८ : राज्यात प्लास्टिक बंदी अस्तित्वात असली तरी बाजारपेठेत कृत्रिम (प्लास्टिक) फुलांचा वाढता वापर शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलांच्या व्यवसायावर परिणाम करत आहे. प्लास्टिक फुलांच्या बंदीसाठी विशेष सूचना काढण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य शशिकांत शिंदे, अमित गोरखे, अमोल मिटकरी, सदाभाऊ खोत, अनिल परब यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्लास्टिक बंदीच्या विद्यमान अधिसूचनेअंतर्गतच विशेष अधिसूचना काढून प्लास्टिक व कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्यात येईल. महानगरपालिकांना अशा प्रकारच्या बाजारपेठांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले जाणार असून, प्लास्टिक फुलांचा वापर करणाऱ्या डेकोरेशन व्यावसायिक, बँक्वेट हॉल्स आणि इतर संबंधित घटकांनाही नोटिस दिली जाईल. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल बंदी अधिसूचना २०१८ नुसार सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकोलवर पूर्णतः बंदी आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २९ ऑगस्ट २०२५ रोजी सण-उत्सव काळात कृत्रिम फुलांचा वापर टाळण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत १,२४,७८३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली यापैकी ३,३९० आस्थापनांवर कारवाई करण्यात येऊन १.५५ कोटी दंड वसूल करण्यात आला असून ६७.५४ मेट्रिक टन एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket