यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये फार्मा अन्वेषण–२०२६ महाराष्ट्र कार्यक्रम दिमाखदार उत्साहात संपन्न
कार्यक्रमामध्ये प्रमुख व्याख्यान, पॅनेल चर्चा, बैठका आणि सादरीकरण यांचे यशस्वी आयोजन
सातारा : भारतातील आधुनिक फार्मसी शिक्षणाचे जनक मानले जाणारे प्रा. एम. एल. श्रॉफ यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया पुरस्कृत व नॅशनल फार्मसी वेलफेर अससोसिएशन यांचे सहयोगाने फार्मा अन्वेषण–२०२६ हा राज्यस्तरीय शैक्षणिक व संशोधनाभिमुख कार्यक्रम सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फार्मसी विभागात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्याची माहिती फार्मा अन्वेषणचे पश्चिम विभाग सहसमन्वयक व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य श्री. विजय पाटील यांनी दिली. या कार्यक्रमात राज्यभरातील प्राध्यापक, संशोधक, औषध उद्योगातील तज्ज्ञ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“फ्युचर फार्मा इकोसिस्टम : अकॅडेमिया, इंडस्ट्री, रिसर्च, रेग्युलेटरी आणि प्रॅक्टिस यांच्यात समन्वय निर्माण करणे” या विषयावर आधारित या कार्यक्रमात सुमारे पाचशेहून अधिक सहभागी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र भाजप केमिस्ट अॅण्ड फार्मासिस्ट प्रकोष्ठाचे प्रदेशाध्यक्ष श्री. श्रीकांत दुबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाचे सहआयुक्त श्री. गिरीश हुकरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या फार्मा विभागाचे अध्यक्ष श्री. मंगेश चिवटे, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य डॉ. नीरज उपमन्यु, डॉ. एम. वेंकट रामन्ना, डॉ. संजय तोश्णीवाल आणि डॉ. प्रकाश वांजरी हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन यशोदा इन्स्टिट्यूट्स, सातारा चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच यशोदा इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
या वेळी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. झुव्हॅन्टस – एमक्युअर फार्मास्युटिकल्सचे रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट संचालक डॉ. विक्रम घार्गे, इंडस बायोटेक प्रा. लि., पुणे येथील मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रसाद ठाकूरदेसाई, तसेच स्वलावा एंटरप्रायझेस प्रा. लि., बेंगळुरूचे सहसंस्थापक व संचालक डॉ. विजय कुलकर्णी यांनी फार्मा क्षेत्रातील संशोधन, उद्योगातील संधी आणि उद्योजकतेच्या नव्या दिशा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे उपाध्यक्ष श्री. धनंजय जोशी, सदस्य श्री. प्रविण पाटील, पोलफार्मा पोलंड (इंडिया) चे हेड – लायसन्सिंग अॅण्ड बिझनेस डेव्हलपमेंट डॉ. भीमराव जाधव, सातारा जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सागर पाटील आणि सचिव श्री. अभय गरगटे यांचीही विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात ५० पेक्षा अधिक कंपन्या आणि १०० पेक्षा अधिक महाविद्यालयांचा सहभाग होता.
कार्यक्रमामध्ये कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी, कराडचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. यादव, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराडचे विभागप्रमुख डॉ. आर. जे. डायस, एनपीडब्ल्यूएचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल तसेच अंबाबाई तालीम संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी, मिरजचे प्राचार्य डॉ. संदीप शेळके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. गणेश सुरवसे, डॉ. प्रकाश जाधव आणि डॉ. विठ्ठल चवरे, तसेच सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमामध्ये संशोधन सादरीकरणे, पोस्टर प्रेझेंटेशन, उद्योग-अकॅडेमिया संवाद आणि विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रातील संधी, फार्मा उद्योगातील करिअरच्या दिशा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील फार्मसी शिक्षणाला नवे व्यासपीठ मिळाले असून विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यात संवाद आणि सहकार्याची नवी दारे खुली झाली आहेत. उपस्थित मान्यवरांनी भविष्यात अशा प्रकारचे शैक्षणिक व संशोधनपर कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया भांडवलकर आणि प्रा. ज्योत्स्ना गांधी यांनी प्रभावीपणे केले.
यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये फार्मा अन्वेषण–२०२६ महाराष्ट्र कार्यक्रम दिमाखदार उत्साहात संपन्न
कार्यक्रमामध्ये प्रमुख व्याख्यान, पॅनेल चर्चा, बैठका आणि सादरीकरण यांचे यशस्वी आयोजन
सातारा : भारतातील आधुनिक फार्मसी शिक्षणाचे जनक मानले जाणारे प्रा. एम. एल. श्रॉफ यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया पुरस्कृत व नॅशनल फार्मसी वेलफेर अससोसिएशन यांचे सहयोगाने फार्मा अन्वेषण–२०२६ हा राज्यस्तरीय शैक्षणिक व संशोधनाभिमुख कार्यक्रम सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फार्मसी विभागात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्याची माहिती फार्मा अन्वेषणचे पश्चिम विभाग सहसमन्वयक व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य श्री. विजय पाटील यांनी दिली. या कार्यक्रमात राज्यभरातील प्राध्यापक, संशोधक, औषध उद्योगातील तज्ज्ञ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“फ्युचर फार्मा इकोसिस्टम : अकॅडेमिया, इंडस्ट्री, रिसर्च, रेग्युलेटरी आणि प्रॅक्टिस यांच्यात समन्वय निर्माण करणे” या विषयावर आधारित या कार्यक्रमात सुमारे पाचशेहून अधिक सहभागी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र भाजप केमिस्ट अॅण्ड फार्मासिस्ट प्रकोष्ठाचे प्रदेशाध्यक्ष श्री. श्रीकांत दुबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाचे सहआयुक्त श्री. गिरीश हुकरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या फार्मा विभागाचे अध्यक्ष श्री. मंगेश चिवटे, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य डॉ. नीरज उपमन्यु, डॉ. एम. वेंकट रामन्ना, डॉ. संजय तोश्णीवाल आणि डॉ. प्रकाश वांजरी हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन यशोदा इन्स्टिट्यूट्स, सातारा चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच यशोदा इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
या वेळी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. झुव्हॅन्टस – एमक्युअर फार्मास्युटिकल्सचे रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट संचालक डॉ. विक्रम घार्गे, इंडस बायोटेक प्रा. लि., पुणे येथील मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रसाद ठाकूरदेसाई, तसेच स्वलावा एंटरप्रायझेस प्रा. लि., बेंगळुरूचे सहसंस्थापक व संचालक डॉ. विजय कुलकर्णी यांनी फार्मा क्षेत्रातील संशोधन, उद्योगातील संधी आणि उद्योजकतेच्या नव्या दिशा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे उपाध्यक्ष श्री. धनंजय जोशी, सदस्य श्री. प्रविण पाटील, पोलफार्मा पोलंड (इंडिया) चे हेड – लायसन्सिंग अॅण्ड बिझनेस डेव्हलपमेंट डॉ. भीमराव जाधव, सातारा जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सागर पाटील आणि सचिव श्री. अभय गरगटे यांचीही विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात ५० पेक्षा अधिक कंपन्या आणि १०० पेक्षा अधिक महाविद्यालयांचा सहभाग होता.
कार्यक्रमामध्ये कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी, कराडचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. यादव, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी, कराडचे विभागप्रमुख डॉ. आर. जे. डायस, एनपीडब्ल्यूएचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल तसेच अंबाबाई तालीम संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी, मिरजचे प्राचार्य डॉ. संदीप शेळके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. गणेश सुरवसे, डॉ. प्रकाश जाधव आणि डॉ. विठ्ठल चवरे, तसेच सर्व विभागप्रमुख आणि प्राध्यापक यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमामध्ये संशोधन सादरीकरणे, पोस्टर प्रेझेंटेशन, उद्योग-अकॅडेमिया संवाद आणि विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रातील संधी, फार्मा उद्योगातील करिअरच्या दिशा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील फार्मसी शिक्षणाला नवे व्यासपीठ मिळाले असून विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यात संवाद आणि सहकार्याची नवी दारे खुली झाली आहेत. उपस्थित मान्यवरांनी भविष्यात अशा प्रकारचे शैक्षणिक व संशोधनपर कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया भांडवलकर आणि प्रा.ज्योत्स्ना गांधी यांनी प्रभावीपणे केले.