Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वरचा कायापालट होणार! नगरपरिषदेच्या सभेत ३८ विकासकामांना हिरवा कंदील; रस्ते, पाणी आणि पर्यटनावर भर.

महाबळेश्वरचा कायापालट होणार! नगरपरिषदेच्या सभेत ३८ विकासकामांना हिरवा कंदील; रस्ते, पाणी आणि पर्यटनावर भर.

महाबळेश्वरचा कायापालट होणार! नगरपरिषदेच्या सभेत ३८ विकासकामांना हिरवा कंदील; रस्ते, पाणी आणि पर्यटनावर भर.

महाबळेश्वर: पर्यटननगरी महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेची महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभा शुक्रवारी (१३ मार्च) उत्साहात पार पडली. नगराध्यक्ष सुनील लक्ष्मण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि पर्यटन विकासाशी संबंधित तब्बल ३८ विषयांवर सविस्तर चर्चा करून त्यांना सर्वानुमते हिरवा कंदील देण्यात आली.

पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण:रस्ते आणि पाणीपुरवठा

सभेमध्ये शहरातील वाढत्या वस्तीचा विचार करता रस्ते आणि पाणीपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे:

रिपन काळे वस्ती: येथील रस्त्याचे डांबरीकरण करून नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे.

लिंगमळा परिसर: येथील जुनी झालेली पाणी पाईपलाईन बदलून रहिवाशांना नवीन कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

रांजणवाडी-गादळवाडी: आराम चौक ते रांजणवाडी-गादळवाडी या महत्त्वाच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजुरी देण्यात आली, ज्यामुळे स्थानिक व पर्यटकांचा प्रवास सुखकर होईल.

स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचे पाऊल

महाबळेश्वरचे पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी नगरपरिषदेने ठोस पावले उचलली आहेत:

STP प्लांट:रांजणवाडी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (STP) दुरुस्ती करण्यात येणार असून, गादळवाडी येथे नवीन आधुनिक एसटीपी प्लांट बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

E-toilets: शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध ठिकाणी ‘ई-टॉयलेट्स’ बसविली जाणार आहेत.

पर्यटन वाढीसाठी ‘कलाकार कट्टा’ आणि सुशोभीकरण

पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या वेण्णा लेक आणि मुख्य बाजारपेठेसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे:

वेण्णा लेक:बोटींग क्लबच्या सुलभ कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरविले जाईल.

कलाकार कट्टा: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मार्केटचे सुशोभीकरण करून तिथे स्थानिक कलाकारांसाठी ‘कलाकार कट्टा’ विकसित केला जाणार आहे.

महत्त्वपूर्ण सामाजिक व प्रशासकीय निर्णय:

नामांतर: शहरातील जातीवाचक नावांच्या वस्त्या किंवा ठिकाणांची नावे बदलून त्यांना महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक सामाजिक निर्णय या सभेत चर्चेला आला.

पे अँड पार्क: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौक ते अहिल्यादेवी होळकर चौक दरम्यान सशुल्क पार्किंग सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

कर्मचारी सुरक्षा: स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नवीन सुरक्षा उपकरणे आणि जंतुनाशकांची तातडीने खरेदी केली जाईल.

स्मशानभूमी सुधारणा: गोटेनिरा जन्निमाता स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी नवीन पत्राशेड उभारले जाणार आहे.

शहराच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आज घेतलेले ३८ निर्णय महाबळेश्वरच्या विकासात मैलाचा दगड ठरतील.” 

सुनील लक्ष्मण शिंदे, नगराध्यक्ष, महाबळेश्वर.

या सभेला नगरपरिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket