अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » शहिद बाळकृष्ण निकम यांच्या निधनाने पिंपळोशी दुःखात

शहिद बाळकृष्ण निकम यांच्या निधनाने पिंपळोशी दुःखात 

शहिद बाळकृष्ण निकम यांच्या निधनाने पिंपळोशी दुःखात 

सिक्कीम येथे देशसेवेसाठी कर्तव्य बजावताना श्री.बाळकृष्ण विलासराव निकम यांना वीरमरण आले. पाटण खोऱ्यातील जवळपास तीन किलोमीटर अंतरावरील पिंपळोशी गाव. शहीद बाळकृष्ण निकम यांच्या निधनाची बातमी व्हाटस् एप, स्टेटसच्या माध्यमातून झटकन पोहोचली. आणि पिंपळोशी गावच नव्हे तर तालुक्यावर शोककळा पसरली. तेवीस वर्षे देशसेवा करताना वयाचा जास्त कालावधी घर, गावापेक्षा नोकरीसाठीच घालवला. सहकाऱ्यांशी असणाऱ्या ऋणानुबंधांमुळे नोकरी म्हणजे एक कुटुंबच झाले होते. त्यामुळे कुटुंबाइतकाच आघात सहकाऱ्यांवर झालेला आहे. 

         दुःखद बातमी कळताच प्रत्येकजण, नातलग, मित्रपरिवार शहिद बाळकृष्ण निकम यांच्या घराकडे धाव घेत होता. हंबरडा फोडणारी आई, हुंदका दाबून धरलेले वडील, कंठ दाटून आलेला भाऊ शिवराज, प्रत्येक आठवणीने आक्रोश करणारी बहीण रूपाली, ऊर बडवून मुलांचे मायेचं छत्र हरपलेली पत्नी पूनम, वडील म्हणून गमावलेल्या देवाची वाट पहाणारी मुलं अर्णव आणि प्रणव हे सगळेजण डोळ्यात प्राण आणून वाटेकडे टक लावून होते. 

    एरवी शांत वाटणाऱ्या पिंपळोशी गावात उन्हाच्या झळांपेक्षा शहिद निधनाच्या बातमीची तीव्रता जास्त होती. शहिद बाळकृष्ण निकम यांच्यासोबत सुट्टीला आल्यावर रमणारे मित्र शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पाडण्यासाठी नि:शब्द होऊन तयारी करण्यासाठी सरसावले. पण “आता आपल्या काळजाचा तुकडा परत भेटणार नाही” हे जाणून निधनाच्या बातमीनंतर डोळ्यांतून अश्रूंची धार ओसरत नव्हती. 

      भेटायला येणारा प्रत्येकजण हंबरडा फोडून अश्रूंना वाट करून देत होते. संपूर्ण गावावर पसरलेली शोककळा पाहून पिंपळोशी गावच्या पंचक्रोशीतील निरव शांतता यांच्या देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या शहिद बाळकृष्ण निकम यांच्या अखेरच्या कौतुकासाठी मुठी आवळून एक एक श्वास घेत घेत होते. सुट्टीला आल्यावर सगळयांना भेटणाऱ्या फौजीला अखेरचा निरोप देण्यासाठी गावातील प्रत्येकाचं ह्दय दाटून आलेलं. शहिद म्हणून नावलौकिक मिळविला तरी त्यांच्या नसण्याची खंत मनाला सलत होती. कुटुंबियांचा, मित्रपरिवाराचा आक्रोश तर काळजाचा ठोका चुकवत होता.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket