अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » केळघरमध्ये अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरण-डांबरीकरण कामाला प्रारंभ

केळघरमध्ये अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरण-डांबरीकरण कामाला प्रारंभ

केळघरमध्ये अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरण-डांबरीकरण कामाला प्रारंभ

केळघर-सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून केळघर येथील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटी करण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच केळघर चे उपसरपंच शंकर बेलोशे यांच्या हस्ते झाला.बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून २५/१५या योजनेतून केळघर येथील अंतर्गत रस्ता डांबरीकरण व काँक्रीटी करण साठी सुमारे ७०लाख एवढा भरीव निधी उपलब्ध झाल्याने केळघर या तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेच्या गावांत रस्ते मजबूत व दर्जेदार होऊन गावाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी दिली.

या रस्त्याच्या कामाच्या प्रारंभी उपसरपंच शंकर बेलोशे, माजी सरपंच बबनराव बेलोशे, सुनील जांभळे, रवींद्र सल्लक श्रीपती बेलोशे,अंकुश बेलोशे,,सचिन बिरामणे, सागर पार्टे, बाजीराव पार्टे, मनोहर शिर्के ,तुकाराम धनावडे,रामचंद्र दळवी, सूर्यकांत चव्हाण,लक्ष्मण बिरामणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामास सुरुवात झाली आहे.

केळघर हे जावळी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असून सातारा-महाबळेश्वर या मुख्य रस्तावरील गाव आहे. केळघर गावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून दिला असून येथील प्रलंबित कामे टप्याटप्याने पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार असून येथील रस्त्याच्या डांबरीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीच्या समस्या कमी होऊन ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे:शिवेंद्रसिंहराजे भोसले:सार्वजनिक बांधकाममंत्री

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निधीतून रस्त्याच्या कामाच्या प्रारंभप्रसंगी शंकर बेलोशे. समवेत बबनराव बेलोशे, सुनील जांभळे, रवींद्र सल्लक, अंकुश बेलोशे, सचिन बिरामणे, सागर पार्टे आदी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket