सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » Uncategorized » यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘फार्मा अन्वेषण – २०२६’ चे आयोजन

यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘फार्मा अन्वेषण – २०२६’ चे आयोजन

यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘फार्मा अन्वेषण – २०२६’ चे आयोजन

सातारा-फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या वतीने आणि यशोदा टेक्निकल कॅम्पस ‘फॅकल्टी ऑफ फार्मसी’ विभागातर्फे ‘फार्मा अन्वेषण – २०२६’ या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी ना. श्री छत्रपती शिवेंद्रसिहंराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे होणार आहे. हे अन्वेषण राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनानिमित्त आयोजित करण्यात आले असून, भारतीय फार्मसी शिक्षणाचे जनक प्रा. एम. एल. श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविला जात आहे. या परिषदेचा मुख्य विषय ‘फ्युचर फार्मा इकोसिस्टम: फौस्टरिंग सिनर्जी अमंग अकॅडेमिया, इंडस्ट्री, रिसर्च, रेग्युलेटरी अँड प्रॅक्टिस’ असा आहे.

यशोदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दशरथ सगरे, उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य श्री विजय पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व प्रेरणेमुळे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन शक्य झाले असून, संस्थेच्या या दूरदृष्टीमुळेच शैक्षणिक क्षेत्र आणि औषधनिर्मिती उद्योग यांच्यात एक भक्कम दुवा निर्माण होत आहे. तसेच संस्थेचे रजिस्ट्रार डॉ गणेश सुरवसे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. डी. जाधव, फार्मसी विभाग प्रमुख डॉ. ए. एम. भागवत आणि एम. फार्मसी विभाग प्रमुख डॉ. एल. एम. पुराणे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे फार्मसी क्षेत्रातील संशोधक, विद्यार्थी आणि उद्योजक यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांना संशोधनाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न साकार होत आहे.

‘फार्मा अन्वेषण – २०२६’ च्या माध्यमातून शैक्षणिक, औषधनिर्मिती उद्योग, संशोधक, नियामक संस्था, प्राध्यापक आणि विद्यार्थी या सर्वांना औषधनिर्मिती क्षेत्रातील नव्या संधी व सहकार्याबाबत विचारमंथन करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्याने, समूह चर्चा, पोस्टर सादरीकरण, स्पर्धा आणि नेटवर्किंग सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. विशेषतः उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक प्रोत्साहन देण्यावर या परिषदेत विशेष भर दिला जाणार आहे. या अन्वेषणासाठी राज्यातील विविध फार्मसी महाविद्यालये, औषधनिर्मिती उद्योग, संशोधक आणि विद्यार्थी यांसह सुमारे ७०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अकॅडेमिया-इंडस्ट्री सहकार्य बळकट करणे, संशोधनाला चालना देणे आणि फार्मसी शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

*यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘फार्मा अन्वेषण – २०२६’ चे आयोजन*

सातारा/प्रतिनिधी

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या वतीने आणि यशोदा टेक्निकल कॅम्पस ‘फॅकल्टी ऑफ फार्मसी’ विभागातर्फे ‘फार्मा अन्वेषण – २०२६’ या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी ना. श्री छत्रपती शिवेंद्रसिहंराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे होणार आहे. हे अन्वेषण राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनानिमित्त आयोजित करण्यात आले असून, भारतीय फार्मसी शिक्षणाचे जनक प्रा. एम. एल. श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविला जात आहे. या परिषदेचा मुख्य विषय ‘फ्युचर फार्मा इकोसिस्टम: फौस्टरिंग सिनर्जी अमंग अकॅडेमिया, इंडस्ट्री, रिसर्च, रेग्युलेटरी अँड प्रॅक्टिस’ असा आहे.

यशोदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दशरथ सगरे, उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे आणि फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य श्री विजय पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व प्रेरणेमुळे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन शक्य झाले असून, संस्थेच्या या दूरदृष्टीमुळेच शैक्षणिक क्षेत्र आणि औषधनिर्मिती उद्योग यांच्यात एक भक्कम दुवा निर्माण होत आहे. तसेच संस्थेचे रजिस्ट्रार डॉ गणेश सुरवसे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. डी. जाधव, फार्मसी विभाग प्रमुख डॉ. ए. एम. भागवत आणि एम. फार्मसी विभाग प्रमुख डॉ. एल. एम. पुराणे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे फार्मसी क्षेत्रातील संशोधक, विद्यार्थी आणि उद्योजक यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांना संशोधनाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न साकार होत आहे.

‘फार्मा अन्वेषण – २०२६’ च्या माध्यमातून शैक्षणिक, औषधनिर्मिती उद्योग, संशोधक, नियामक संस्था, प्राध्यापक आणि विद्यार्थी या सर्वांना औषधनिर्मिती क्षेत्रातील नव्या संधी व सहकार्याबाबत विचारमंथन करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्याने, समूह चर्चा, पोस्टर सादरीकरण, स्पर्धा आणि नेटवर्किंग सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. विशेषतः उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक प्रोत्साहन देण्यावर या परिषदेत विशेष भर दिला जाणार आहे. या अन्वेषणासाठी राज्यातील विविध फार्मसी महाविद्यालये, औषधनिर्मिती उद्योग, संशोधक आणि विद्यार्थी यांसह सुमारे ७०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अकॅडेमिया-इंडस्ट्री सहकार्य बळकट करणे, संशोधनाला चालना देणे आणि फार्मसी शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket