अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » राष्ट्रीय लोकअदालतीचे १४ मार्च रोजी आयोजन

राष्ट्रीय लोकअदालतीचे १४ मार्च रोजी आयोजन

राष्ट्रीय लोकअदालतीचे १४ मार्च रोजी आयोजन

सातारा दि. 12: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालय, सातारा तसेच सर्व तालुका न्यायालयात शनिवार दि. १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी दिली आहे.

जिल्हयातील सर्व न्यायालयांतील तडजोडपात्र स्वरुपाची दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात येणार आहेत. तडजोड होवू शकणारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी १४ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवावयावी असल्यास संबंधित न्यायालयात जावून प्रकरण तडजोडीसाठी ठेवावयाचे आहे असे संबंधित अधिक्षक अथवा लिपिक तसेच संबंधित वकिलांना कळवावे. लोक अदालतीत तडजोड झाल्याने कायमस्वरुपी वाद मिटू शकेल, क्षुल्लक वादाचे पर्यावसन कायमस्वरूपी वादात होणार नाही हाच लोक अदालतीचा हेतू आहे. शिवाय लोक अदालतीतील निकालाविरुध्द अपील होत नाही. वेळेची व पैशाची बचत होते.

लोक अदालतीमध्ये दिवाणी, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे ठेवावयाची असल्यास संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहनही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी केले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket