Home » देश » इस्राएल इराण युद्धामध्ये अमेरिका यशस्वी होणार नाही चीन

इस्राएल इराण युद्धामध्ये अमेरिका यशस्वी होणार नाही चीन 

इस्राएल इराण युद्धामध्ये अमेरिका यशस्वी होणार नाही चीन

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील हे युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. अद्यापही हे युद्ध सुरू असून इराण अमेरिका-इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर देत आहे.

मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या या युद्धजन्य परिस्थितीबाबत आता अनेक देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर आता चीनने देखील मोठी भूमिका मांडली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणधील राजवट बदलण्याबाबत अनेकदा वक्तव्य केलेली आहेत. या अनुषंगाने आणि अमेरिका-इस्रायल व इराणमधील संघर्षाबाबत चीनने भूमिका मांडली आहे.

अमेरिका-इस्रायलच्या सुरू असलेल्या हल्ल्यादरम्यान इराणमध्ये राजकीय बदल घडवून आणण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांविरुद्ध चीनने इशारा देत म्हटलं की, अमेरिकेच्या अशा प्रयत्नांना सार्वजनिक पाठिंबा मिळणार नाही, तसेच बाह्यरित्या चालविलेले राजवट बदल घडवून आणण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. तसेच अमेरिका-इस्रायल व इराणमधील हे युद्ध घडायलाच नको होतं”, असं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे.

बीजिंगमधील एका पत्रकार परिषदेत बोलताना चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी म्हटलं की,”तेहरानमध्ये ‘रंग क्रांती’ किंवा बाह्यरित्या चालविलेले राजवट बदल घडवून आणण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. कारण ‘रंग क्रांती’ घडवणं किंवा सरकार बदलण्याची मागणी करणं याला लोकांचा पाठिंबा मिळणार नाही. इराण आणि इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला गेला पाहिजे आणि शत्रुत्व थांबवलं पाहिजे”, असं मंत्री वांग यी यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

“अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील हे असं युद्ध आहे, जे घडायला नको होतं आणि हे असं युद्ध आहे जे कोणाचंही भलं करत नाही. शक्ती कोणताही उपाय देत नाही आणि सशस्त्र संघर्ष केवळ द्वेष वाढवतो व नवीन संकटे निर्माण करतो”, असंही मंत्री वांग यी यांनी म्हटलं आहे.

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी असंही म्हटलं की, “मध्य पूर्वेतील देशांनी त्यांचे व्यवहार स्वतः ठरवले पाहिजेत. मध्य पूर्वेतील लोक या प्रदेशाचे खरे हकदार आहेत आणि या प्रदेशाचे व्यवहार तेथील देशांनी स्वतंत्रपणे ठरवले पाहिजेत.” दरम्यान, चीनने अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्षाबाबत सर्व पक्षांना राजनैतिक संबंध पुन्हा व्यवस्थित करण्याचे आणि शक्य तितक्या लवकर वाटाघाटीकडे व संवादाद्वारे मतभेद सोडवण्याचे आवाहन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा”

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा” मुंबई-देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता

Live Cricket