अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » पांचगणी नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक पुढाकार _‘झिरो वेस्ट कॅम्पस’ व नवीन घनकचरा व्यवस्थापन नियमांवर मार्गदर्शन_

पांचगणी नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक पुढाकार _‘झिरो वेस्ट कॅम्पस’ व नवीन घनकचरा व्यवस्थापन नियमांवर मार्गदर्शन_

पांचगणी नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक पुढाकार

_‘झिरो वेस्ट कॅम्पस’ व नवीन घनकचरा व्यवस्थापन नियमांवर मार्गदर्शन_

पांचगणी गिरिस्थान नगरपरिषद यांच्या वतीने झिरो वेस्ट कॅम्पस तसेच नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर आज हिलदारीच्या सहकार्याने नगरपरिषद सभागृहात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन नगरपरिषद अध्यक्ष श्री. दिलीप भाऊ बागडे, श्री. शेखर कसुर्डे, आरोग्य सभापती राजश्री सणस तसेच सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर उपक्रमासाठी पांचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून पालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. शेखर कसुर्डे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करत शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिक, शाळा व हॉटेल व्यावसायिकांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे सांगितले. पांचगणीसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील शहरात कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात श्री. आशिष वैष्णव यांनी कोरडा व बागेतील कचऱ्यापासून पेललेटिंग तंत्रज्ञानाद्वारे ऊर्जा व उपयुक्त उत्पादने तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात कॅप्टन राहुल (नारी केअर) यांनी सॅनिटरी पॅडमुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकत त्यावरील पर्यावरणपूरक उपाययोजनांची माहिती दिली.

त्यानंतर हिलदारीचे डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी झिरो वेस्ट कॅम्पस संकल्पनेचे सविस्तर स्पष्टीकरण करत शाळा, हॉटेल्स व इतर संस्थांनी स्त्रोतावर कचरा वर्गीकरण, पुनर्वापर व प्रक्रिया करून कचरा शून्य करण्यासाठी कोणती पावले उचलावीत याबाबत मार्गदर्शन केले. तसेच १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ मधील महत्त्वाच्या तरतुदी व जबाबदाऱ्या यांची माहितीही त्यांनी दिली. झिरो वेस्ट कॅम्पस उपक्रम यशस्वीपणे राबविणाऱ्या संस्थांचा पर्यावरण दिनानिमित्त सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

या कार्यशाळेत पंचगणीतील विविध शाळा व हॉटेल्समधील ५० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. सर्व सत्रांना सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक शाळा व हॉटेल्सनी आपले कॅम्पस झिरो वेस्ट करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली.

पांचगणी गिरिस्थान नगरपरिषदेमार्फत पुढाकार घेवून हिलदारी च्या सहकार्याने नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत जनजागृती करण्यासाठी तसेच मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या घटकांना शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी प्रोत्साहन देत आहे जेणेकरून पांचगणी चे निसर्ग सौदर्य जपतांना शाश्वत विकास सुद्धा करता येईल. सदर उपक्रमाचे सहभागीशाळा व हॉटेल्स च्या लोकांनी कौतुक करत पांचगणीसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket