“एन. आय. पी. एम. सह्याद्री सातारा चॅप्टर”च्या अंतर्गत पहिल्या स्टुडण्ट चॅप्टरचे उद्घाटन
सातारा -सातारा येथे प्रथमच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ परसोनेल मॅनेजमेन्ट (NIPM) सह्यादी सातारा चॅप्टरने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत कर्मवीर भाऊराव पाटील इन्सस्टिट्युट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज अॅण्ड रिसर्च (KBMIMSR), वर्ये येथे आपल्या पहिल्या स्टुडण्ट चॅप्टरची स्थापना केली आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मानव संसाधन (HR) क्षेत्रातील व्यावसायिक मार्गदर्शन आणि उद्योग क्षेत्राशी थेट संवादाची संधी उपलब्ध होत आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत तसेच एच आर क्षेत्रातील मान्यवर व एन. आय. पी. एम. चे सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदरच्या कार्यक्रमाला एन. आय. पी. एम. चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील, राष्ट्रीय परिषद सदस्य श्री. अभय खुरसाळे, एन. आय. पी. एम सह्याद्री सातारा चॅप्टरचे अध्यक्ष डॉ उदय भोसले, उपाध्यक्ष श्री नितीन देशपांडे, सचिव – श्री. महेश खरे श्री. धैर्यशील देसाई मेगासोल कॉर्प, डॉ एस आर निकम, डॉ. भोला, डॉ. कुंभार व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी KBMIMSR तर्फे “Redefining the Roles of HR Managers in Contemporary Organizations” या विषयावर एक दिवसीय व्यवस्थापन विकास कार्यक्रम (MDP) आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात एच आर व्यवस्थापकांच्या बदलत्या भूमिका आणि आधुनिक उद्योगातील आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली .
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व एच आर विभागातील तज्ञ व अनुभवी कूपर कॉर्पोरेशन प्रा.लि. चे चिफ हयुमन रिसोर्सेस ऑफिसर व एन. आय. पी. एम. सह्याद्री सातारा चॅप्टरचे उपाध्यक्ष श्री. नितीन देशपांडे यांचे “Empirical Studies in HRM- Approaches and applications” या विषया वरती मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.
त्याचबरोबर विप्रो पारी, शिरवळचे ग्लोबल हेड इम्प्लॉइज अॅण्ड रिलेशन, अॅडमिन व एन. आय पी एम सह्याद्री सातारा चॅप्टरचे अध्यक्ष डॉ उदय भोसले यांचे ही “Evolving Role of HR Manager” या महत्वपुर्ण विषयावर प्राशिक्षण आयोजित करण्यात आलेले होते .
या उपक्रमाला कूपर कॉर्पोरशन प्रा. लि., विप्रो पारी प्रा. लि., कमिन्स इंडिया लि., डेलवाल फ्लो कंट्रोल्स प्रा. लि., युमिकोर ऑटोकास्ट इंडिया प्रा. लि., जिनिती साइकाल इंडिया प्रा. लि., स्पेशालिटी युरीथिन्स प्रा. लि., जोशी जंपाला इजिनिअरींग वर्क्स, अॅक्मे इन्फोविजन सिस्टिम्स् प्रा. लि., पिलर ब्लोअर्स अॅण्ड कॉम्प्रेसर इंडिया प्रा.लि., श्री एचआर सर्व्हिसेस, इ. उद्योग आस्थापनांच्या एच आर विभागातील प्रतिनीधींनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वीत पार पाडला.
या विद्यार्थी अध्यायाच्या स्थापनेमुळे सातारा जिल्ह्यातील विद्यार्थयांना एच आर क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून उद्योग शिक्षण क्षेत्रातील समन्वय अधिक बळकट होणार आहे.




