वैद्यकीय सेवेचा गौरव : डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी व डॉ. प्राची प्रसाद जोशी यांना सातारा प्राईड 2026 पुरस्कार जाहीर
फलटण : ग्रामीण भागात अत्याधुनिक आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा देत अस्थिरोग उपचार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी आणि डॉ. प्राची प्रसाद जोशी यांना सातारा मीडिया सेवन तर्फे दिला जाणारा सातारा प्राईड 2026 हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. प्रसाद जोशी आणि डॉ. प्राची जोशी यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेला जोशी हॉस्पिटल प्रा. लि. चा प्रवास आज पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेल्या अस्थिरोग रुग्णालयांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अगदी छोट्याशा जागेत सुरू झालेल्या या रुग्णालयाने आज वटवृक्षाप्रमाणे विस्तार घेत राज्यातील अग्रगण्य अस्थिरोग हॉस्पिटल म्हणून नाव कमावले आहे.
फलटणसारख्या ग्रामीण भागातही गुणवत्तापूर्ण व परवडणाऱ्या दरात अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत जोशी हॉस्पिटलने सर्वसामान्य रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे. अत्याधुनिक सुविधा आणि अनुभवी वैद्यकीय सेवा यामुळे या रुग्णालयाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे.
वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही डॉ. जोशी दाम्पत्याचा सक्रिय सहभाग असतो. फलटण मॅरेथॉन सारख्या उपक्रमातून त्यांनी हजारो नागरिकांना फिटनेसचा संदेश दिला आहे. या मॅरेथॉनचे उत्कृष्ट नियोजन डॉ. प्रसाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली केले जाते.
आरोग्य सेवा आणि समाजकार्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत सातारा मीडिया सेवन तर्फे दिला जाणारा सातारा प्राईड 2026 पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.




