अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » जनसेवेची ओळख असलेले नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे ‘सातारा प्राईड पुरस्कार’चे मानकरी

जनसेवेची ओळख असलेले नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे ‘सातारा प्राईड पुरस्कार’चे मानकरी

जनसेवेची ओळख असलेले नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे ‘सातारा प्राईड पुरस्कार 2026’चे मानकरी

पाचगणी : नगराध्यक्षपदापर्यंतचा संघर्षपूर्ण आणि प्रेरणादायी प्रवास करणारे पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांना सातारा मीडिया सेव्हन तर्फे दिला जाणारा ‘सातारा प्राईड पुरस्कार 2026’ जाहीर झाला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि जनतेसाठी केलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

सन १९७९ साली जकात नाका शिपाई म्हणून काम करत असताना दिलीप बगाडे यांनी आपल्या नोकरीकडे केवळ उपजीविकेचे साधन म्हणून पाहिले नाही. सामान्य कर्मचारी म्हणून काम करताना प्रशासनाची कार्यपद्धती, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या. काम हेच खरे नेतृत्व ही शिकवण त्यांच्या मनात याच काळात रुजली.

साधी राहणी, शांत स्वभाव आणि सर्वांशी आपुलकीने संवाद साधण्याची वृत्ती यामुळे ते अल्पावधीतच लोकांच्या मनात स्थान निर्माण करू शकले. सामाजिक कार्यातून त्यांनी जनतेच्या प्रश्नांशी आपले नाते जोडले. सामान्य माणसाच्या वेदना, गरजा आणि अपेक्षा समजून घेत त्यांनी सार्वजनिक आणि राजकीय जीवनात पाऊल टाकले.

नगरसेवक, उपनगराध्यक्ष ते नगराध्यक्ष असा त्यांचा प्रवास हा केवळ पदांचा टप्पा नसून जनतेच्या विश्वासातून उभा राहिलेला प्रवास आहे.

नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी केवळ पद स्वीकारले नाही, तर पाचगणीकरांच्या अपेक्षा आपल्या खांद्यावर घेतल्या. शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यांच्या मते विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती किंवा योजना नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात सकारात्मक आणि आश्वासक बदल घडवणे होय.

आज मोठे पद आणि जबाबदाऱ्या मिळाल्यानंतरही त्यांच्या स्वभावातील साधेपणा कायम आहे. मितभाषी स्वभाव, साधी राहणी आणि समोरच्या व्यक्तीचे म्हणणे मनापासून ऐकून घेण्याची सवय हे गुण त्यांना वेगळे ठरवतात.

त्यांच्या याच कार्याची दखल घेत सातारा मीडिया सेव्हन तर्फे दिला जाणारा’ सातारा प्राईड पुरस्कार 2026′ त्यांना जाहीर करण्यात आला असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket