नंदकिशोर परदेशी यांची “सातारा प्राईड 2026” पुरस्कारासाठी निवड जाहीर
वाई : बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता आणि विश्वासार्हतेचा नवा मापदंड निर्माण करणारे सिव्हिल इंजिनियर नंदकिशोर परदेशी यांची “सातारा प्राईड 2026” पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे.
मंगलश्याम कन्स्ट्रक्शन, वाईच्या माध्यमातून नंदकिशोर परदेशी यांनी बांधकाम क्षेत्रात वेगळेपण जपत सर्वसामान्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. दर्जेदार बांधकाम, वेळेचे काटेकोर नियोजन आणि पारदर्शक कामकाज यामुळे “मंगलश्याम कन्स्ट्रक्शन म्हणजे गुणवत्ता” असे समीकरण निर्माण झाले आहे.
स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करत अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. बांधकाम क्षेत्रातील त्यांचे नाव विश्वासाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
त्यांच्या या उल्लेखनीय उद्योजकीय कार्याची दखल घेत सातारा न्यूज मीडिया सेवन तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा “सातारा प्राईड 2026” पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीबद्दल बांधकाम व व्यावसायिक क्षेत्रातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.




