Home » राज्य » शिक्षण » अजिंक्य सगरे यांना “सातारा प्राईड 2026” पुरस्कार जाहीर

अजिंक्य सगरे यांना “सातारा प्राईड 2026” पुरस्कार जाहीर

अजिंक्य सगरे यांना “सातारा प्राईड 2026” पुरस्कार जाहीर

सातारा : सातारा येथील नामांकित शैक्षणिक समूह यशोदा शिक्षण संस्था (YSPM)चे तरुण आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजिंक्य सगरे यांना “सातारा प्राईड 2026” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

संस्थेचे उपाध्यक्ष (Vice-President) म्हणून कार्यरत असलेले अजिंक्य सगरे हे संस्थापक प्रा.दशरथ सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे आधुनिक व्यवस्थापन आणि विस्ताराची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. साताऱ्यातील शैक्षणिक क्षेत्रात एक ‘युवा चेहरा’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

अजिंक्य सगरे यांच्या पुढाकाराने संस्थेत केवळ शैक्षणिक उपक्रमांपुरते मर्यादित न राहता ‘यशोत्सव’सारखे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे.

परदेशातील शिक्षण पद्धतीचा विशेष अभ्यास करून आधुनिक व नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रणाली संस्थेत विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. माफक दरात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत सातारा मीडिया सेव्हन यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “सातारा प्राईड 2026” पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडणार

दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे दर्शन घडणार महाराष्ट्र दालनाचे १४ला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन नवी

Live Cricket