अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सहकाररत्न प्रभाकर (दादा) साबळे यांना “सातारा प्राईड” पुरस्कार जाहीर

सहकाररत्न प्रभाकर (दादा) साबळे यांना “सातारा प्राईड” पुरस्कार जाहीर

सहकाररत्न प्रभाकर (दादा) साबळे यांना “सातारा प्राईड” पुरस्कार जाहीर

सातारा : सहकार क्षेत्रात भरीव व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व देणारे सहकाररत्न प्रभाकर साबळे (दादा) यांना “सातारा प्राईड” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सहकारातील दीपस्तंभ म्हणून ओळख असलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.

शिवशक्ती सहकारी पतसंस्था लिमिटेड, शिवथर ही ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची सहकारी संस्था असून, संस्थापक अध्यक्ष प्रभाकर (दादा) साबळे यांच्या नेतृत्वात संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने जिल्ह्यात आपला विशेष ठसा उमटवला आहे.

संस्थेमार्फत बचतीची सवय रुजवून अनेकांच्या जीवनात अमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणण्यात आले आहेत. तसेच व्यावसायिक वाढीसाठी दिलेल्या आर्थिक पाठबळामुळे अनेक उद्योजक व व्यावसायिकांनी यशस्वीपणे आपले करिअर घडविले आहे. या यशाचे प्रमुख श्रेय प्रभाकर (दादा) साबळे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला दिले जाते.

सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सातारा मीडिया सेवन आयोजित “सातारा प्राईड” पुरस्काराने त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ट पतसंस्था म्हणून शिवशक्ती सहकारी पतसंस्थेचा उल्लेख होत असून, सहकार क्षेत्रात संस्थेची झपाट्याने होत असलेली प्रगती ही त्यांच्या सक्षम नेतृत्वाची साक्ष देत आहे.

प्रभाकर (दादा) साबळे यांच्या या निवडीबद्दल सहकार क्षेत्रातून समाधान व्यक्त होत असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket