Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » वरिष्ठ पत्रकार अमर मोकाशी यांची “सातारा प्राईड” पुरस्कारासाठी निवड जाहीर

वरिष्ठ पत्रकार अमर मोकाशी यांची “सातारा प्राईड” पुरस्कारासाठी निवड जाहीर

वरिष्ठ पत्रकार अमर मोकाशी यांची “सातारा प्राईड” पुरस्कारासाठी निवड जाहीर

सातारा : वीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणारे वरिष्ठ पत्रकार अमर मोकाशी यांची “सातारा प्राईड” पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे.

पत्रकारितेतील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सातारा मीडिया सेवन तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

अमर मोकाशी यांनी ऐक्य, लोकमत, व्हिजन वार्ता आदी दैनिकांमध्ये उप संपादक तसेच लाईव्ह सातारा चे संपादक म्हणून काम करताना सातारा जिल्ह्याच्या पत्रकारीता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राजकीय घडामोडींवरील त्यांचा व्यासंगी अभ्यास, विश्लेषणात्मक लेखनशैली आणि तटस्थ भूमिकेमुळे त्यांनी वाचकांचा विश्वास संपादन केला आहे.

“सातारा प्राईड” हा महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार असून विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी प्रदान केला जातो.अमर मोकाशी यांच्या निवडीबद्दल पत्रकारिता क्षेत्रातून समाधान व्यक्त होत असून, त्यांच्या कार्याचा गौरव होत असल्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket