अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वर मध्ये डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियानाचे आयोजन

महाबळेश्वर मध्ये डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियानाचे आयोजन

महाबळेश्वर मध्ये डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियानाचे आयोजन

महाबळेश्वर :महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी महाबळेश्वर शहरात महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या महास्वच्छता अभियानामध्ये महाबळेश्वर शहर व परिसरातील नागरिकांनी तसेच सेवाभावी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून सातत्याने समाजपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जातात.त्यात प्रामुख्याने वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर,दाखले वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप,अंध व मुकबधीर विद्यार्थ्यांना मदत, उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर, पाणपोई, बस थांबे, अपघातग्रस्तांना मदत, या सारखे अनेक उपक्रम महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविले जातात.

रविवार दि. १ मार्च रोजी सकाळी ७:३० वाजता महाबळेश्वर शहरात विविध ठिकाणी तसेच शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पदमश्री डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. या स्वच्छता अभियानामध्ये महाबळेश्वर शहर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी व संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket