Home » राज्य » शिक्षण » रोहोट चे वनपाल कामात अन लेखणीत ही भारी! जैवविविधता महामंडळ 14 पुस्तके करणार प्रकाशित

रोहोट चे वनपाल कामात अन लेखणीत ही भारी! जैवविविधता महामंडळ 14 पुस्तके करणार प्रकाशित 

रोहोट चे वनपाल कामात अन लेखणीत ही भारी! जैवविविधता महामंडळ 14 पुस्तके करणार प्रकाशित 

सातारा तालुक्यातील निसर्गरम्य अशी नैसर्गिक पर्यटन स्थळे तेथील जैवविविधता औषधी वनस्पती यांची माहिती तसेच वन परिमंडळ रोहोट येथील सविस्तर माहिती येथील वनपाल राजाराम काशीद यांनी संग्रही केली आहे या माहिती माहितीची 14 पुस्तके महाराष्ट्र शासन प्रकाशित करणार आहे त्यामुळे साताऱ्याचा साताऱ्याच्या नावलौकिकात भर पडणार आहे.

सातारा तालुक्यातील रोहोट येथे वन विभागात कार्यरत असलेले राजाराम सुभाष काशीद( वनपाल )यांची 14 पुस्तके वन विभागाच्या जैवविविधता या विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासन प्रकाशित करणार आहे असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी राजाराम काशीद यांना मुंबई येथे मंत्रालयात भेटी प्रसंगी दिले.

राजाराम काशीद हे रोहोट येथे वनपाल म्हणून कार्यरत आहेत गेली 19 वर्षे ते वन विभागात कार्यरत असून त्यांनी आपल्या सेवेत अनेक उल्लेखनीय असे काम केले आहे उपवनसंरक्षक सातारा तसेच मुख्यवनसंरक्षक कोल्हापूर यांचे कडूनही त्यांना उत्कृष्ट कामाबाबत सन्मानित केले आहे.

संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून भांबवली धबधबा परिसरातील गावातील लोकांना एकत्रित करून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले तसेच कास पठार अंतर्गत 6गावात समन्वयं ठेऊन कास पठाराचे उत्पन्न वाढीसाठी खूप चांगले प्रयत्न केले आहेत.पशुहानी, मानवहानी, मानव व वन्यजीव संघर्ष कमी करणे वन्य प्राणी यांचे करिता कृत्रिम पानवठे तयार केले आहेत याबरोबरच स्थानिक आणि वन विभाग यांनी एकत्रित येऊन अनेक उपक्रम राबवले आहेत त्यांनी निसर्ग संपन्न सातारा तालुका, आशिया खंडातील सर्वात उंच भांबवली वजराई धबधबा,औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग, जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ कास पठार भाग एक, जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ कास पठार भाग दोन ,फुलं झाडे फळझाडे पालेभाज्या फळभाज्या यांचे औषधी उपयोग,नियतक्षेत्र डिस्कळ पुस्तक,वनपरिमंडळ रोहोट पुस्तिका, कास पठार टिपणी, भांबवली वजराई धबधबा टिपणी,रोहोट परिमंडळ टिपणी, सिमेंट पिलर रजिस्टर डिस्कळ, कास पठारावरील जैवविविधता,रोहोट परिमंडळ नमुना नंबर एक पुस्तक अशी पुस्तके लिहिली असून या पुस्तकांचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशन होणार आहे अशी माहिती त्यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली आहे ही पुस्तके जिल्हा बरोबरच महाराष्ट्राला सातारा जिल्ह्याची नैसर्गिक वनसंपदा तसेच येथील पर्यटन निसर्ग यांची सविस्तर माहिती या पुस्तकातून मिळेल अशी अपेक्षा वनपाल राजाराम काशीद यांनी व्यक्त केली आहे .

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket