अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » डोंगरी महोत्सवाच्या नियोजनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी घेतला आढावा

डोंगरी महोत्सवाच्या नियोजनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी घेतला आढावा

डोंगरी महोत्सवाच्या नियोजनाचा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी घेतला आढावा

सातारा – महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निर्देशानुसार दौलतनगर (मरळी) येथे २ ते ६ एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या डोंगरी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी महोत्सवाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेत विविध विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

यावेळी विविध पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोनपे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महोत्सवाच्या मुख्य मैदानासह कृषी, पशुपक्षी व महिला बचत गटांच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याच्या जागेची पाहणी करण्यात आली. स्थानिक शेतकरी, उद्योजक व महिला स्वयंसहायता गटांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन काटेकोर असावे, तसेच स्टॉलची मांडणी, पाणी व वीज सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षा याबाबत विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.

सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रमांच्या आयोजनासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचीही पाहणी करण्यात आली. भजन, बॅण्ड, पोवाडे, लावणी स्पर्धा, तसेच फूड स्टॉल व फनफेअर परिसराची रचना सुयोग्य पद्धतीने करावी, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित व आनंददायी वातावरणात कार्यक्रमांचा लाभ घेता येईल.याशिवाय, महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणाऱ्या कोयना नदीतील बोटींग सुविधेच्या ठिकाणाची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, जीवनरक्षक साधनसामग्री, तसेच संबंधित विभागांकडून आवश्यक परवानग्या वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी दिल्या.  

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket