पुस्तकाचे गाव भिलार येथे प्रकल्प कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
भिलार -दि. २७ फेब्रुवारी हा दिन कविवर्य वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन त्यांच्या स्मरणार्थ मराठी भाषा गौरवदिन पुस्तकांचं गाव, भिलार येथे प्रकल्प कार्यालयाच्या वतीने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी यशदा सत्र-संचालिका स्वाती कुलकर्णी आणि यशदाचे उप-संचालक श्री. मंगेश जोशी (भा.प्र.से), सर्व वैद्यकीय अधिकारी, प्रकल्पातील दालन चालक श्री. भिकू भिलारे हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे, शशिकांत भिलारे, नेहा शिंदे,बालाजी हळदे उपस्थित होते
या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी ‘यशदा’ च्या ४४ वैद्यकीय प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी क्षेत्रभेटीच्या निमित्ताने भेट दिली. अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काव्यवाचन, कविता सादरीकरण करुन मराठी भाषेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कवितेचे सादरीकरण केलेल्या डॉक्टरांना प्रकल्पातर्फे मा.श्री. मंगेश जोशी यांच्या हस्ते पुस्तक भेट देण्यात आले.
महाराष्ट्र गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयापासुन जिल्हा परिषद केंद्र शाळेपर्यंत पदयात्रा काढली. मा. श्री. मंगेश जोशी यांच्या हस्ते केंद्रशाळेमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश जाधव यांनी केले, कार्यक्रमाची आखणी व मांडणी श्री बालाजी हाळदे यांनी केली व श्रीमती उमा शिंदे यांनी आभार मानले.




