अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » वाई अर्बन बँकेतर्फे अमरीन इनामदारचा गौरव

वाई अर्बन बँकेतर्फे अमरीन इनामदारचा गौरव 

वाई अर्बन बँकेतर्फे अमरीन इनामदारचा गौरव 

वाई दि 24 – प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे झालेल्या संचलन कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चित्ररथाचे नेतृत्व करणाऱ्या वाईतील अमरीन आजीम इनामदार या विद्यार्थिनीचा दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके तर्फे नुकताच गौरव करण्यात आला. बँकेच्या संचालिका व वाईच्या नूतन नगरसेविका सौ ज्योती गांधी यांच्या हस्ते व बँकेचे अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डॉ शेखर कांबळे तसेच बँकेच्या संचालकांच्या उपस्थितीत अमरीनला गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ .शेखर कांबळे म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचा बहुमान आपल्या वाईनगरीची कन्या अमरीन इनामदार हिच्या रूपाने आपल्या वाई गावाचा गौरव झालेला आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ देशात पहिल्या क्रमांकाने गौरविला गेला, ही खूपच अभिमानाची बाब आहे. अमरीनच्या रूपाने वाई मधील गुणवंतांची परंपरा पुढे राखली जात आहे. वाई अर्बन बँक नेहमीच गुणवंतांचा आणि कर्तृत्वान व्यक्तींचा गौरव करीत असते. अमरीनच्या हातून भविष्यातही खूप चांगली कामगिरी व्हावी, अशी सदिच्छा. 

बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनीही अमरीनला शुभेच्छा दिल्या. वाईच्या किसनवीर महाविद्यालयात एम ए च्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने आपल्या कलागुणांमुळे महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे नेतृत्व केले ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. सामान्य कुटुंबातून येऊन तिने असामान्य असे काम केले आहे.,असे ते म्हणाले.

बँकेचे संचालक रमेश ओसवाल, अॅड. बाळासाहेब पंडित, मकरंद मुळे, विवेक पटवर्धन, माधव कान्हेरे, काशिनाथ शेलार, महेश राजेमहाडिक, चंद्रकांत गुजर, प्रीतम भुतकर, स्वप्निल जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे, सरव्यवस्थापक संतोष बागुल आदींनी अमरीनचे अभिनंदन केले व तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket