अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि भविष्यसज्ज महाराष्ट्र!

कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि भविष्यसज्ज महाराष्ट्र!

कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि भविष्यसज्ज महाराष्ट्र!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नॅसकॉम टेक्नोलॉजी अँड लीडरशिप फोरम 2026’ या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, एआयमुळे जागतिक बाजारपेठेत मोठा बदल घडत आहे. आपल्या शासनाने हा बदल सकारात्मक दृष्टीने स्वीकारला असून, महाराष्ट्राला भविष्यसज्ज करण्याचा संकल्प आहे. एआयचा व्यापक स्वीकार (Adoption) आणि या क्षेत्रात सक्षम व कौशल्यपूर्ण नवी प्रतिभा तयार करणे ही काळाची गरज आहे. यासंदर्भात मुंबईत एक कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रस्ताव नॅसकॉमकडे मांडण्यात आला आहे. 

राज्य शासन कृषी क्षेत्रासाठी एआयचा वापर करत असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचा डिजिटल सहकारी म्हणून ‘महाविस्तार AI’ हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे, जो शेतकऱ्यांना पिकांनुसार सल्ला देतो. तसेच अचूक हवामान अंदाज, कीड व रोग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करतो आणि बाजारभाव व बाजारपेठेसंदर्भातील संकेतांची माहिती उपलब्ध करून देतो. याशिवाय, विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती आणि त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शनही केले जाते. या प्लॅटफॉर्मद्वारे शेती अधिक तंत्रज्ञानाधारित, माहितीसमृद्ध आणि सक्षम होण्यास मदत होत आहे.

पॉलिसी-लेड ग्रोथ हा राज्य शासनाचा मंत्र असून बिझनेस आणि त्याची गरज ओळखून आपले शासन पावले उचलत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. यावेळी नॅसकॉमच्या अध्यक्षा सिंधू गंगाधरन, पीडब्ल्यूसी इंडियाचे अध्यक्ष संजीव क्रिशन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket