अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रकटदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ३४३ जणांचे रक्तदान

गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रकटदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ३४३ जणांचे रक्तदान

गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रकटदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; ३४३ जणांचे रक्तदान

निगडी प्रतिनिधी :निगडी प्राधिकरण येथील गजानन महाराज मंदिरात गजानन महाराजांचा १४८ वा प्रकटदिन भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या पवित्र दिनाचे औचित्य साधून निसर्गराजा मित्र जीवांचे, रॉबिन हूड आर्मी आणि गजानन महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

‘अध्यात्मासोबत रुग्णसेवा हाच खरा ईश्वरसेवेचा मार्ग’ या उदात्त संकल्पनेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या असंख्य भक्तांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ३४३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांचा सहभाग लक्षणीय व कौतुकास्पद ठरला.

या उपक्रमात सहभागी सर्व स्वयंसेवक व रक्तदात्यांना पर्यावरणपूरक कापडी पिशवी भेट म्हणून देण्यात आली. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

या रक्तदान शिबिरासाठी डी. वाय. पाटील ब्लड बँक, पिंपरी तसेच वाय. सी. एम. रक्तपेढी, पिंपरी यांनी मोलाचे सहकार्य केले. यासोबतच सुप्रीम फॅसिलिटी मॅनेजमेंट लिमिटेड, पुणे आणि नोव्याम टेक्नोलॉजी यांचेही उल्लेखनीय योगदान लाभले.

गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त अध्यात्म, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket