Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » सुरक्षेसाठी झटणाऱ्यांना सुविधा; श्याम सेल्सची सातारा तालुका पोलीस स्टेशनला एलईडी टीव्ही भेट

सुरक्षेसाठी झटणाऱ्यांना सुविधा; श्याम सेल्सची सातारा तालुका पोलीस स्टेशनला एलईडी टीव्ही भेट

सुरक्षेसाठी झटणाऱ्यांना सुविधा; श्याम सेल्सची सातारा तालुका पोलीस स्टेशनला एलईडी टीव्ही भेट

सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवत उपक्रमाचे कौतुक

सातारा प्रतिनिधी :सातारा तालुका पोलीस स्टेशनला श्याम सेल्स मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स परिवाराच्या वतीने एलईडी टीव्हीची सप्रेम भेट देण्यात आली. पोलीस प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात माहितीप्रसारण व कार्यालयीन सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम उद्योजक प्रशांत घोरपडे यांच्या प्रेरणेतून सामाजिक दायित्वाच्या भावनेतून साकार करण्यात आला.

या कार्यक्रमावेळी श्याम सेल्स परिवाराकडून अभिजीत घोरपडे, राहुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस दल समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असते. त्यांच्या कामात थोडीशी मदत होणे, हीच या उपक्रमामागील भूमिका असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सामाजिक उपक्रमाबद्दल पोलीस प्रशासनाने श्याम सेल्स परिवाराचे आभार मानले.

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी होम अप्लायन्सेस आणि मोबाईल फोन विक्रीची साखळी म्हणून श्याम सेल्स ओळखली जाते. ऑनलाइनपेक्षा स्वस्त दर, पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्ह सेवेमुळे श्याम सेल्सने ग्राहकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. फ्रिज, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एलईडी टीव्ही, एअर कंडिशन, मोबाईल फोन यासह विविध नामवंत कंपन्यांची अत्याधुनिक आणि दर्जेदार उत्पादने एकाच छत्राखाली उपलब्ध करून देण्यात श्याम सेल्स नेहमीच आघाडीवर राहिली आहे.

लाखो समाधानी ग्राहकांच्या विश्वासावर उभ्या राहिलेल्या श्याम सेल्सचा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात दबदबा असून, केवळ व्यावसायिक यशापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपण्याची भूमिका संस्थेने कायम ठेवली आहे. यापूर्वीही श्याम सेल्सकडून विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले असून, सदर उपक्रम त्याचाच एक भाग आहे.

अशा उपक्रमांमुळे उद्योग आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ होत असून, सामाजिक जबाबदारी जपणाऱ्या उद्योजकांचे योगदान प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

उद्योजकीय तंत्र कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत. -श्रीरंग काटेकर.

उद्योजकीय तंत्र कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत. -श्रीरंग काटेकर. गौरीशंकर एम.बी.ए. लिंब महाविद्यालयात उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. -लिंब स्पर्धात्मक

Live Cricket