सेवेच्या देवदूतांचा गौरव : सातारा हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय महिला डॉक्टर दिन साजरा
सातारा प्रतिनिधी- राष्ट्रीय महिला डॉक्टर दिनानिमित्त मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सातारा हॉस्पिटल व सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे महिला डॉक्टरांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.जयश्री शिंदे व मधुमेह तज्ञ डॉ. दिपांजली पवार प्रमुख उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डॉ. दिपांजली पवार यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामाजिक जीवनातही महिला डॉक्टरांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले. डॉ.जयश्री शिंदे यांनी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत त्या आजही सर्वांसाठी प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. राष्ट्रीय महिला डॉक्टर दिनाच्या निमित्ताने महिला डॉक्टरांचा सन्मान करण्याची ही परंपरा गौरवास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी डॉ. जयश्री शिंदे व डॉ. दिपांजली पवार यांच्या हस्ते हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. प्रियांका काकडे, सीनियर डॉक्टर डॉ. अर्चना त्रिपुटे, डॉ. मीरा खाडे, डॉ. अंजली जोंधळे, डॉ. तेजश्री वेल्हाळ, डॉ. ऐश्वर्या ढाणे, डॉ. दीपिका डोंगरे, डॉ. धनश्री, डॉ. पल्लवी, डॉ. वैभवी, डॉ. ताझीम यांच्यासह महालक्ष्मी वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिओथेरपी इंटर्न डॉक्टर व राजमाता नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुरेश शिंदे, सर्जन डॉ. अनिल शिंदे, सीईओ विक्रमसिंह शिंदे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. कपिल जगताप, फिजिशियन डॉ. दत्तात्रेय मोरे, डॉ. गीतांजली साळुंखे, डॉ. मंगेश टोनपे, डॉ. सुशील घार्गे, सीनियर मेडिकल ऑफिसर डॉ. भास्कर लोंढे, सीएमओ डॉ. विकास जाधव, डॉ. निलेश साबळे यांच्यासह हॉस्पिटलचा संपूर्ण वैद्यकीय, नर्सिंग व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व नियोजन पब्लिक रिलेशन ऑफिसर श्रीकांत देशमुख यांनी केले.



