अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » पाचगणी नगरपरिषदेत विविध समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड

पाचगणी नगरपरिषदेत विविध समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड

पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेत स्थायी व विषय समित्यांची निवड

पाचगणी ( प्रतिनिधी)पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेमध्ये सन २०२६ साठी स्थायी समिती तसेच विविध विषय समित्यांच्या सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून, नगरपरिषदेतील गटनेत्यांनी शिफारस केलेल्या नावांनुसार समित्यांची रचना करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आला.

नगरपरिषदेच्या विविध विकासात्मक व प्रशासकीय कामकाजासाठी महत्त्वाच्या असलेल्या समित्यांवर खालीलप्रमाणे सभापती व सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियोजन व विकास समिती

या समितीच्या सभापतीपदी श्री. प्रकाश गेणदेव गोळे यांची पदसिद्ध सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून श्री. शेखर दाजीनाना कासुर्डे, अनिता पांडुरंग चोपडे, स्वाती गौतम कांबळे व श्री. प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांचा समावेश आहे.

स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती

या समितीच्या सभापतीपदी  राजश्री अजय सणस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून परवीन फिरोज मेमन, श्री. आकाश सुनील बगाडे, श्री. गणेश शांताराम कासुर्डे व श्री. विनोद वसंतराव बिरामणे यांची निवड झाली आहे.

महिला व बालकल्याण समिती (७५ टक्के महिला सदस्य)

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सुप्रिया महेश माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून माधुरी अजित कासुर्डे,  स्वाती गौतम कांबळे, श्रीमती अमृता प्रकाश गोळे व  अभिलाषा वैभव कऱ्हाडकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती

या समितीच्या सभापतीपदी  विमल गजानन भिलारे यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून श्री. महेश अनिल खांडके, श्री. अमित अनिल कांबळे,  अमृता प्रकाश गोळे व श्री. प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम समिती

सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी श्री. राजेंद्र वसंत पारठे यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून श्री. नरेंद्र विजय बिरामणे, श्री. आकाश सुनील बगाडे,  शिल्पा सुनील माने व श्री. वैभव राजेंद्र कन्हाडकर यांचा समावेश आहे.

स्थायी समिती

स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी श्री. दिलीप कुशाबा बगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून श्री. प्रकाश गेणदेव गोळे, श्री. राजेंद्र वसंत पारठे,  राजश्री अजय सणस,  विमल गजानन भिलारे व सुप्रिया महेश माने यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन समित्यांच्या माध्यमातून पाचगणी शहराच्या विकासकामांना गती मिळेल, तसेच स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रभावी निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket