जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महिला वर्गाची मते ठरणार निर्णायक. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी महाराष्ट्राच्या विकासाचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योगदान देणे हीच खरी श्रध्दांजली ठरेल-जिल्हाधिकारी संतोष पाटील सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेच्या वतीने महिला सभासदांसाठी हळदी-कुंकू’ कार्यक्रम उत्साहात संपन्न वडूजला मतदान जागृतीसाठी नवमतदारांशी वैयक्तिक संवाद उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची प्रीतिसंगम येथे स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना आदरांजली
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेच्या वतीने महिला सभासदांसाठी हळदी-कुंकू’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेच्या वतीने महिला सभासदांसाठी हळदी-कुंकू’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेच्या वतीने महिला सभासदांसाठी हळदी-कुंकू’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

“सहकार भुषण” ‘धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या’ वतीने मुख्यकार्यालयात मकर संक्रांतीनिमित्त महिला सभासदांसाठी हळदी-कुंकू आणि वाण वाटपाचा कार्यक्रम शुक्रवार दि. २३ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांचे सामाजिक संघटन आणि त्यांचा सन्मान करणे या उद्देशाने या धन्वंतरी पतसंस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे यांनी धन्वंतरी पुजन करून महिला संचालक व सभासद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. सौ. मंगल भोसले, सौ. मंगल फडतरे, सौ. संध्या काळे, सौ. हेमलता भोईटे, सौ. अमृता भोसले, डॉ. सौ. माधुरी कोडगुले, सौ. स्मिता देशमुख, सौ. संगीता पवार, सौ. माधवी डिंगणे, सौ. श्वेता बोडस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमा प्रसंगी साधारण ३०० महिला सभासद उपस्थित होत्या. संस्थेच्या महिला संचालीका डॉ. सौ. सारीका मस्कर यांनी संस्थेच्या विविध योजनांची माहिती उपस्थित महिलांना दिली तसेच संस्थेच्या वतीने सहभागी महिलांना आकर्षक ‘वाण’ आणि भेटवस्तू देण्यात आल्या.तसेच या निमित्ताने दि.२४ जानेवारी २०२६ रोजी ३० ते ६५ वयोगटातील १०० महिलांच्या आरोग्य विषयक तपासण्या करण्यात आल्या.

या प्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यांनी संस्थेच्या विविध ठेव योजना, कर्ज योजनांची माहिती देताना त्यांनी धन्वंतरी पतसंस्थेच्या व्यवसायवाढी मध्ये महिला सभासदांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे सांगितले व संस्थेने एकत्रित व्यवसाय ३१५ कोटींचा पार केलेबद्दल सर्व ग्राहक व सभासद यांना त्यांनी धन्यवाद देऊन मार्च २०२६ अखेर ३२५ कोटीं व्यवसायाचे पुढील लक्ष पुर्ण करण्याचे आवाहन या वेळी केले. सदर आवाहनास प्रतिसाद म्हणून या दिवशी संस्थेकडे रू. १० कोटी इतकी एकत्रीत व्यवसायवाढ झाली.

संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे या प्रसंगी बोलताना म्हणाले की प्रति तोळा रू. १ लाख २ हजार इतके सोने तारण कर्ज दिले जात आहे तसेच धन्वंतरी समृद्धी ठेव योजनेचा व्याजदर दसादशे ९ टक्के व मागणी ठेव (किमान १५ दिवस मुदत) चा व्याजदर दसादशे ६ टक्के केला आहे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून अशा कार्यक्रमांमुळे सभासदांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होऊन महिलांना त्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी बचतीची सवय वाढीस लागते असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी साहाय्यक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अल्का मुरूमकर, सौ. सुषमा पवार, सौ. रूपाली शिंदे, सौ. निशा यादव, सौ. कलावती चव्हाण, कु. मानसी मोने व श्रीमती. अनुजा केळकर यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास संचालक डॉ. अरविंद काळे, डॉ. शिरीष भोईटे, डॉ शकिल अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदिप चव्हाण, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. नारायण तांबे, डॉ. सुनिल कोडगुले, अॅड. सुर्यकांत देशमुख, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीहरी डिंगणे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महिला वर्गाची मते ठरणार निर्णायक.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महिला वर्गाची मते ठरणार निर्णायक. सातारा-. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये महिला वर्गाची मते

Live Cricket