अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची प्रीतिसंगम येथे स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना आदरांजली

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची प्रीतिसंगम येथे स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना आदरांजली

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची प्रीतिसंगम येथे स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना आदरांजली

कराड प्रतिनिधी -आज प्रीतिसंगम कराड येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली. यासोबतच आदरणीय वेणुताई यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधलेल्या स्मारकाला भेट देऊन, यशवंतराव चव्हाण साहेब व वेणुताई चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार ह्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच कराड येथे येऊन स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झाल्या. 

स्व. चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे दिवंगत लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या जनसमर्पक कार्याचे अढळ प्रेरणास्थान होते. त्यामुळे आदरणीय अजितदादा व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नातेही अत्यंत निराळे व जिव्हाळ्याचे होते. आदरणीय अजितदादा वारंवार कराड येथे प्रीतिसंगमावर येऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन करत होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकांनंतर आपल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्याची सुरुवातही आदरणीय अजितदादांनी याचप्रमाणे केली होती.

यावेळी आज समाधीस्थळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सौ. रूपाली चाकणकर, खासदार श्री. नितीन पाटील, माजी खासदार श्री. श्रीनिवास पाटील, माजी आमदार श्री. बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील, पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, कराडचे नगराध्यक्ष श्री. राजेंद्रसिंह यादव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व राष्ट्रवादी परिवाराचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket