राज्याचे लोकनेते तथा उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय नेत्यांची श्रद्धांजली
सातारा प्रतिनिधी –राज्याचे लोकनेते तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त सातारा जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा पार पडली. या शोकसभेत मान्यवरांनी स्व.अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
खासदार श्री. नितीनकाका पाटील यांनी आपल्या मनोगतात दादांचे समाजकारण, प्रभावी नेतृत्व, प्रशासकीय कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यांचा विशेष उल्लेख केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
स्व.अजितदादा पवार यांचे विचार, कार्य आणि संघर्षमय जीवन पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थनाही करण्यात आली.
या श्रद्धांजली सभेस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार श्री. शंभूराज देसाई, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार श्री. नितीन पाटील, आमदार श्री. शशिकांत शिंदे, आमदार श्री. मनोज घोरपडे, माजी आमदार श्री. बाळासाहेब पाटील, माजी आमदार श्री. आनंदराव पाटील, माजी आमदार श्री. दीपक चव्हाण यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



