अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » किल्ले प्रतापगड ते वाडाकुंभरोशी दरम्यान ४ किमीचा रोपवे उभारणार; ना. शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही

किल्ले प्रतापगड ते वाडाकुंभरोशी दरम्यान ४ किमीचा रोपवे उभारणार; ना. शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही

किल्ले प्रतापगड ते वाडाकुंभरोशी दरम्यान ४ किमीचा रोपवे उभारणार; ना. शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही

पार येथे भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ; विविध विकासकामांसाठी कोट्यवधींच्या निधीची घोषणा

महाबळेश्वर प्रतिनिधी-महाबळेश्वर तालुक्यातील दळणवळण आणि पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी किल्ले प्रतापगड ते वाडाकुंभरोशी दरम्यान ४ किलोमीटर लांबीचा ‘रोपवे’ उभारण्यात येईल. तसेच तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करून विकासाची गंगा घराघरांत पोहोचवू, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पार (ता. महाबळेश्वर) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर, भाजपचे चिन्मय कुलकर्णी, रवींद्र कुंभारदरे, विजय भिलारे,भिकू दादा सोंङकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पार्वतीपूरला ‘ब’ दर्जा मिळवून देणार

ना. शिवेंद्रराजे म्हणाले की, पार (पार्वतीपूर) हे जागृत देवस्थान असून या तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा मिळवून देण्यासाठी मी वैयक्तिक प्रयत्न करेन.” तसेच, महाबळेश्वर तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. हे प्रकल्प यशस्वी करण्यासाठी जनतेने भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

विरोधकांच्या अपप्रचाराला उत्तर

भाजप हा केवळ एका विशिष्ट वर्गाचा पक्ष असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ना. भोसले म्हणाले की, “भाजप सर्वसमावेशक पक्ष आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडे मुस्लिम महिला उमेदवार देखील रिंगणात आहेत. देशभरात अनेक मुस्लिम उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अमीना शारवान यांच्यासह सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.”

▪️विकासकामांचा धडाका:

सभेत बोलताना त्यांनी आगामी काळातील प्रकल्पांची माहिती दिली:

 ▪️दळणवळण: बामणोली-तापोळा रस्ता जोडण्याचे काम हाती घेणार.

 ▪️ कोकण कनेक्टिव्हिटी:* मुनावळे ते कोकण जोडणारे ३५० कोटींचे काम सुरू असून, प्रतापगड ते पार दरम्यानच्या १२ कोटींच्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. 

▪️वनविभागाचे प्रलंबित प्रश्न:*, शिकेकाई लिलाव आणि वाडा-प्रतापगड केबल मार्ग यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 “मी पूर्वी राष्ट्रवादीत होतो, आता भाजपमध्ये मंत्री म्हणून काम करत आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात योजना केवळ कागदावर न राहता थेट जनतेपर्यंत पोहोचतात, हाच भाजपचा खरा विजय आहे.”

 ना. शिवेंद्रराजे भोसले

अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

या सभेदरम्यान वाळणे येथील सुनील तांबे यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उमेदवार सुभाष सोंडकर (तळदेव गट), सुरेश जाधव (कुंभरोशी गण), गोविंद सकपाळ (तळदेव गण) आणि अमीना शारवान (मेट गुताड गण) यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ जगन्नाथ शेटे,सुभाष शंकरराव सोंङकर,शिवाजी राजापुरे,तुकाराम सपकाळ,संजय मोरे,प्रकाश सोंङकर,विलास जाधव(गुरुजी),संदीप जाधव तसेच भागातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते,गावातील जेष्ठ नागरिक,महिला,युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket