राष्ट्रीय सेवा योजना हा फक्त उपक्रम नसून ती एक प्रबोधनाची चळवळ-श्री. देवेंद्र कदम
राष्ट्रीय सेवा योजना हा फक्त उपक्रम नसून ती एक प्रबोधनाची चळवळ आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईने प्रबोधनाच्या माध्यमातून समाज बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव श्री.देवेंद्र कदम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. कमलसिंग क्षत्रिय यांनी केले तर पाहुण्यांची ओळख व स्वागत डॉ. संध्या पौडमल यांनी केले.
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे तळीये गावात आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. श्री.कदम पुढे म्हणाले कि, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरे संस्कारांची शिदोरी असून स्वयंसेवकांनी यामध्ये सक्रीय सहभाग नोंदविला पाहिजे.आपल्या श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेतलेला विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आदर्श घडवू शकतो.
तळीये गावचे माजी उपसरपंच व चेअरमन श्री.अशोक चव्हाण यांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी आमचे गाव आपल्या श्रमसंस्कार शिबिराला सर्वोतोपरी सहकार्य करेल असे सांगितले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाविद्यालये ही विचारांची आणि संस्काराची शिदोरी देणारी केंद्रे आहेत.
यावेळी बोलताना युवा उद्योजक श्री.सागर भोसले म्हणाले की आजचा तरुण भावी महाराष्ट्राचा शिल्पकार असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्याला एक सशक्त व्यासपीठ लाभते. त्यांनी या विचारमंचाचा पुरेपूर लाभ उठवला पाहिजे.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रा. सुर्यकांत अदाटे यांनी केले. सदर कार्यक्रमास श्री मुधार्ईदेवी शिक्षण संस्थेचे विश्वस्थ श्री. बाळासाहेब कदम, तळीये गावचे सरपंच श्री. सुशिलकुमार शिलवंत,उपसरपंच श्री.विक्रम चव्हाण, श्री.पांडुरंग पवार,श्री.जितेंद्र चव्हाण, श्री. रणजित घनवट, श्री.राजेंद्र चव्हाण, श्री.आण्णासो,कणसे, श्री विठ्ठल पवार,श्री.नागेश चव्हाण,श्री युवराज चव्हाण, बायप सिग्नेट व सर्व कमिटी सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. कमलसिंग क्षत्रिय, डॉ.संध्या पौडमल, डॉ.उत्तम आळतेकर तसेच तळीये ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व रा.से.यो. स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.



