यशोदा इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य दशरथ सगरे यांना पीएच.डी. पदवी
अभियांत्रिकी शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर दर्शवणारे संशोधन: प्रा. दशरथ सगरे
यशोदा इन्स्टिट्यूट्स, साताराचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य दशरथ सगरे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून, त्यांच्या या शैक्षणिक व संशोधनात्मक यशाबद्दल यशोदा इन्स्टिट्यूट्स परिवारात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. अजिंक्य सगरे यांनी “डिझाईन अँड जनरेशन ऑफ डीप लर्निंग बेस्ड एस.आय. इंजिन मॉडेल विथ डीओई रिस्पॉन्स” या अत्यंत समकालीन व तांत्रिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन पूर्ण केले आहे. या अभ्यासातून स्पार्क इग्निशन (एस.आय.) इंजिनची कार्यक्षमता, उत्सर्जन विश्लेषण, डीप लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर तसेच डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट्स (डीओई) या घटकांचा समन्वय साधत मौलिक संशोधनमूल्य निर्माण झाले आहे. हे संशोधन भविष्यातील इंजिन व ऑटोमोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.
या उल्लेखनीय यशानिमित्त यशोदा इन्स्टिट्यूट्समध्ये विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, सचिव, कार्यकारी संचालिका विश्वस्त, कुलसचिव,सहसंचालक, प्राचार्य, विविध महाविद्यालयांचे विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ.अजिंक्य सगरे यांचा गौरव करण्यात आला.
समारंभात बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांनी सांगितले की, “डॉ. अजिंक्य सगरे यांचे संशोधन हे अभियांत्रिकी शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर दर्शवणारे असून, संशोधन व उद्योग क्षेत्र यांच्यातील दरी कमी करण्यास उपयुक्त ठरेल. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे यशोदा इन्स्टिट्यूट्सची संशोधनात्मक परंपरा अधिक बळकट होत आहे.”
डॉ. अजिंक्य सगरे यांनी आपल्या मनोगतात संशोधन प्रवासाबद्दल माहिती देताना डीप लर्निंग, डेटा आधारित मॉडेलिंग व प्रयोगात्मक विश्लेषणाचे महत्त्व स्पष्ट केले. संशोधनात सातत्य, तांत्रिक प्रामाणिकता आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
त्यांच्या या यशाबद्दल विविधक्षेत्रातील मान्यवर यांनी प्रत्यक्ष भेटून तथा फोनवर शुभेच्छा दिल्या. यशोदा इन्स्टिट्यूट्समधील प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक तसेच शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक व संशोधन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



