स्व.अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहणेसाठी रविवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन
सातारा -महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे नुकतेच विमान अपघातात आकस्मिक निधन झाले आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, सातारा जिल्हा परिषद, सातारा येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले आहे.
सदर श्रद्धांजली सभेस जिल्हयातील सर्वपक्षीय आज व माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सर्व सामान्य नागरिक, बंधू भगिनी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खा. श्री. नितीन पाटील यांनी केले आहे .



