आदरणीय स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली यशोदा इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य दशरथ सगरे यांना पीएच.डी. पदवी सुनेत्रा पवार यांनी आज (31 जानेवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. जावलीच्या ‘राव’ मोरे घराण्याचा दैदीप्यमान इतिहास उलगडणार; १ फेब्रुवारीला महाडमध्ये भव्य स्नेहसंमेलन स्व.अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहणेसाठी रविवार  दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन महाबळेश्वर पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी ”वन क्षेत्रात” वनविभागाकडून या प्रकरणाची गंभीर दखल
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » महाबळेश्वर पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी ”वन क्षेत्रात” वनविभागाकडून या प्रकरणाची गंभीर दखल

महाबळेश्वर पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी ”वन क्षेत्रात” वनविभागाकडून या प्रकरणाची गंभीर दखल

महाबळेश्वर पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी ”वन क्षेत्रात” वनविभागाकडून या प्रकरणाची गंभीर दखल

महाबळेश्वर — महाबळेश्वर पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे मैलामिर्श्रित पाणी वनक्षेत्रात जात असल्यामुळे वनक्षेत्राचे नुकसान होत पर्यावरणाची अतोनात हानी होत असल्याची गंभीर दखल महाबळेश्वर वनविभागाने घेतली असून महाबळेश्वर पालिका भारतीय वनअधिनियम १९२७, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व जैवविविधता अधिनियम २००२ अंतर्गत कारवाई करण्यात येण्याबाबतचे पत्र देण्यात आले असून या कारवाईच्या पत्रामध्ये तातडीने या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची देखभाल दुरुस्त करण्याबाबत सक्त सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

महाबळेश्वर पालिकेच्या या सांडपाणी प्रक्रियेबाबतच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास वारंवार तक्रारी देखील गेल्या आहेत मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील याची गांभीर्याने दखल घेतली असून प्रसंगी महाबळेश्वर पालिका अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची शकयता आहे  

महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्यावतीने काही वर्षांपूर्वी शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेतला स्वतः च्या फंडामधून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी केली होती यामध्ये नगरपालिका सोसायटी मध्ये असलेल्या चार दशलक्ष क्षमतेचा एक व हॉटेल ब्लु पार्कनजीक एक दशलक्ष क्षमतेचा एक असे दोन प्रकल्प उभारण्यात आले होते पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे अनेकवेळा देखभाल दुरुती व उपायोजना वेळीच न करण्यात आल्यामुळे तर कधी विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे हा प्रकल्प बंद पडून विना प्रक्रिया केलेले मैलामिश्रित पाणी थेट आजूबाजूच्या जंगलामध्ये सोडले जाते त्यामुळे अनेकवेळा या परिसरात प्रचंड दुर्गंधी असल्यामुळे येणे जाणेच मुश्किल होत असते तर या परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या देखील आरोग्य धोक्यात आले आहे.

महाबळेश्वर पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे नुकताच असाच एक प्रकार समोर आला नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत वन विभागाचे उपवनसंरक्षक सातारा श्री अमोल सातपुते व सहा.वनसंरक्षक (वनीकरण) सातारा,श्री प्रदीप रौधळ,वनक्षेत्रपाल महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांनी पालिकेच्या दोन्ही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पाहणी केली असता त्यांना प्रकल्पाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर हा प्रकल्प बंद पडून त्यातून विनाप्रक्रिया केलेले पाणी वन क्षेत्रात जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तसेच अंबिका व नामदेव सोसायटी कडून येणारी गटर पाईप लाईनचे दोन चेंबर फुटून त्यातील देखील विनाप्रक्रिया केलेले पाणी वनक्षेत्रात जात असल्याचे या पाहणीत दिसले या सोबतच हॉटेल ब्लू पार्क नजीकच्या सांडपाणी प्रकल्पाकडे मधुसागर कडून जाणारी गटर पाईप लाईनचे चेंबर फुटल्यामुळे या परिसरातील देखील मैलामिश्रित पाणी वनक्षेत्रत जात असल्यामुळे वनक्षेत्राचे मोठे नुकसान होत असल्याची गंभीर दाखल वनविभागाने घेतली महाबळेश्वर बाईक्स दिलेल्या पत्रामध्ये वनक्षेत्रात मैलामिश्रित पाणी गेल्याची घटना गंभीर स्वरूपाची असून यामुळे पर्यावरण व वन्यप्राण्याचे नुकसान होत असल्याचे नमूद केले आहे तसेच या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची तातडीने दुरुस्त करण्यात यावी अन्यथा पालिकेविरुद्ध भारतीय वनअधिनियम १९२७, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व जैवविविधता अधिनियम २००२ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे.

महाबळेश्वर पालिका अधिकाऱ्यांनी या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम तातडीने करावीत अन्यथा वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई करण्यात येईल – सुनील लांडगे – वनपरिमंडळ अधिकारी,वनविभाग महाबळेश्वर

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

आदरणीय स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आदरणीय स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली सातारा -महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेले अजित अनंतराव पवार (२२

Live Cricket