जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी गौरीशंकर लिंब फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे नवसंशोधनात उत्तुंग कामगिरी डोळ्यातील होणाऱ्या काचबिंदू आजारावर प्रभावी औषध निर्मिती  मोठी बातमी! सुनेत्रा पवार घेणार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला  अजितदादा : राजकारण, समाज आणि शिक्षण यांना जोडणारे निर्णायक नेतृत्व – प्रा.दशरथ सगरे कोलंबियामध्ये सतेना एअरलाइनचं एक छोटं विमान कोसळलं
Home » ठळक बातम्या » जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी

सातारा दि. 30 : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने खाजगी कंपनी या मधील आस्थापना, सर्व दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स, इत्यादी) या मधील अधिकारी,कर्मचारी, कामगार यांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त नितिन कवले यांनी केले आहे.

अपवादात्मक परिस्थितीत अधिकारी,कर्मचारी, कामगार इत्यादींना मतदाना दिवशी पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासांची सवलत द्यावी. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादीच्या मालक, व्यवस्थापकांनी सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदान करण्याकरिता योग्यती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदारास मतदान करता येणे शक्य न झाल्यास किंवा मतदानापासून वंचित राहिल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनाविरुध्द कारवाई करण्यात येईल.  

आस्थापनेने मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भर पगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, १५/१/३/१, केशव सोना कॉम्प्लेक्स, रविवार पेठ, सातारा दूरध्वनी ०२१६२- २३३०८४ ई मेल-aclsatara@gmail.com या पत्त्यावर तक्रार दाखल करावी.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी सातारा दि. 30 : सातारा जिल्हा परिषद

Live Cricket