जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला
सातारा दि. 29 (जि. मा. का.) : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक-2026 चा कार्यक्रम दि. 13 जानेवारी 2026 रोजी जाहीर केला आहे. राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने राज्यात 28 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सुचना प्रसिध्द करण्याची तारीख – 31 जानेवारी 2026 (शनिवार), मतदानाची तारीख – दि. 7 फेब्रुवारी 2026 (शनिवार) (सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत), मतमोजणीची तारीख – दि. 9 फेब्रुवारी 2026 (सोमवार) (सकाळी 10 पासून), निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिध्द करणे – दि. 11 फेब्रुवारी 2026 (बुधवार) पर्यंत.या निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून निवडणुकीचा निकाल घोषित होईपर्यंत अंमलात राहील.



