राष्ट्रीय सेवा योजना हा फक्त उपक्रम नसून ती एक प्रबोधनाची चळवळ-श्री. देवेंद्र कदम आदरणीय स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली यशोदा इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य दशरथ सगरे यांना पीएच.डी. पदवी सुनेत्रा पवार यांनी आज (31 जानेवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. जावलीच्या ‘राव’ मोरे घराण्याचा दैदीप्यमान इतिहास उलगडणार; १ फेब्रुवारीला महाडमध्ये भव्य स्नेहसंमेलन स्व.अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहणेसाठी रविवार  दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन
Home » Uncategorized » निधन वार्ता » दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली

दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली 

दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली 

मुंबई, दि. २८:- जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशा शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना शोकमग्न श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे.

मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य ४ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राष्ट्रीय सेवा योजना हा फक्त उपक्रम नसून ती एक प्रबोधनाची चळवळ-श्री. देवेंद्र कदम

राष्ट्रीय सेवा योजना हा फक्त उपक्रम नसून ती एक प्रबोधनाची चळवळ-श्री. देवेंद्र कदम राष्ट्रीय सेवा योजना हा फक्त उपक्रम नसून

Live Cricket