भाजपा जावली तालुकावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना श्रद्धांजली
केळघर : वार्ताहर – आज सकाळीच राज्याचे उपमुख्यमंत्री ना .अजित दादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला भाजपा जावली तालुका यांच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी ज्ञानदेव रांजणे म्हणाले , दादांचे नेतृत्व हे सर्वसमावेशक असं होतं , हक्काचा नेता म्हणून त्यांची राज्यात ओळख होती .यावेळी भाजपाचे कुसूंबी गटाचे उमेदवार सौ अर्चनाताई रांजणे , जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर दादा धनावडे तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आजचे निवडणुकीचे दिवसभरातील सर्व प्रचार सभांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले .




