अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » देश » मुंबई व नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार, गडचिरोलीत नवेगाव मोर ते सुरजागडदरम्यान चार पदरी महामार्गास मान्यता

मुंबई व नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार, गडचिरोलीत नवेगाव मोर ते सुरजागडदरम्यान चार पदरी महामार्गास मान्यता

मुंबई व नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार, गडचिरोलीत नवेगाव मोर ते सुरजागडदरम्यान चार पदरी महामार्गास मान्यता

मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळदरम्यान मेट्रो मार्गिका क्रमांक 8 ची 35 किमी जोडणी, नाशिक शहराचा 66 किमी परिक्रमा मार्ग तसेच गडचिरोलीतील नवेगाव मोर–सुरजागड चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच कुठलाही पायाभूत सुविधा प्रकल्प भूसंपादनानंतर पुढील 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. तसेच, नागपूर ते गोंदिया, भंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती देण्याचे निर्देश दिले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण झाल्यास कंत्राटदाराला प्रोत्साहन मूल्य आणि विहित कालावधीपेक्षा जास्त वेळ लागल्यास दंडाची व्यवस्था असलेली ‘ऑटो मोड’ वरील यंत्रणा विकसित करावी. गडचिरोली जिल्ह्यातील महामार्गाचे काम करीत असताना रस्त्याच्या बाजूला गॅस वाहिनीसाठी जागा उपलब्ध असल्याची खात्री करावी. भविष्यात सुरजागडपर्यंत गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासून महामार्गाच्या बाजूला जागेची तरतूद करण्यात यावी. 

पायाभूत प्रकल्पांविषयी माहिती खालीलप्रमाणे…

✅ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 द्वारे जोडण्यास मान्यता

✅ मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किमी, भूमिगत मार्ग 9.25 किमी, उन्नत मार्ग 24.636 किमी, एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत

✅ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके

✅ घाटकोपर (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकांपर्यंत उन्नत स्थानके, 2 स्थानकांमधील सरासरी अंतर 1.9 किमी

✅ 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, भूसंपादनासाठी ₹388 कोटींचा खर्च अपेक्षित

✅ प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण ₹22,862 कोटींचा खर्च अपेक्षित

✅ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाची निर्मिती, मार्गाची एकूण लांबी 66.15 किमी, या प्रकल्पासाठी एकूण ₹3954 कोटींच्या खर्चास मान्यता 

✅ प्रकल्पाला विशेष बाब म्हणून 50% भूसंपादन झाल्यास कार्यादेश देण्याचा निर्णय

✅ गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे-कोनसरी-मूळचेरा-हेदरी-सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किमी लांबीस मान्यता. 4 पदरी सिमेंट काँक्रीटचा महामार्ग

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket