अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » ठळक बातम्या » आरोग्य » सातारा हॉस्पिटल व इस्माईल मुल्ला लॉ कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने माहूलीत आरोग्य तपासणी शिबिर

सातारा हॉस्पिटल व इस्माईल मुल्ला लॉ कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने माहूलीत आरोग्य तपासणी शिबिर

सातारा हॉस्पिटल व इस्माईल मुल्ला लॉ कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने माहूलीत आरोग्य तपासणी शिबिर

सातारा प्रतिनिधी -सातारा हॉस्पिटल अँड सातारा डायग्नोस्टिक सेंटर तसेच इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एनएसएस श्रम संस्कार शिबिरांतर्गत माहूली (ता. जि. सातारा) येथील ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा सुमारे १०० पेक्षा अधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला.

हे शिबिर शनिवार, दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत माहूली येथील श्रीमती आनंदीबाई गिजरे (कृष्णाबाई हॉल) सांस्कृतिक भवनात पार पडले. या तपासणी शिबिरामध्ये रक्तातील साखर तपासणी (BSL), रक्तदाब तपासणी (BP), गरजेनुसार ईसीजी (ECG), नेत्र तपासणी तसेच डॉ. सर्वटे व डॉ. अग्रवाल क्लिनिक यांच्या वतीने अल्प सवलतीच्या दरात चष्मा वाटप करण्यात आले.

या श्रम संस्कार शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सातारा हॉस्पिटलच्या वतीने मॅनेजर श्रीकांत देशमुख यांनी आरोग्य व नियमित आरोग्य तपासण्यांचे महत्त्व याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. वाय. एन. देसाई सर, प्रा. जावळे मॅडम तसेच सिनियर विद्यार्थी प्रतिनिधी ऍड. करण भंडारे यांनी सातारा हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केल्याबद्दल मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुरेश शिंदे, उपस्थित डॉक्टरांची टीम व सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket