Home » Uncategorized » महाबळेश्वर तालुक्यात ‘राष्ट्रवादीची धडाडती तोफ’ तळदेव गटात सज्ज; संजूबाबा गायकवाड यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा

महाबळेश्वर तालुक्यात ‘राष्ट्रवादीची धडाडती तोफ’ तळदेव गटात सज्ज; संजूबाबा गायकवाड यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा

महाबळेश्वर तालुक्यात ‘राष्ट्रवादीची धडाडती तोफ’ तळदेव गटात सज्ज; संजूबाबा गायकवाड यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा

महाबळेश्वर प्रतिनिधी –महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गटातील, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संजूबाबा गायकवाड यांनी जोरदार तयारीनिशी निवडणूक रिंगणात उडी घेतली असून, त्यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

तालुक्यात ‘राष्ट्रवादीची धडाडती तोफ’ म्हणून ओळख असलेले संजूबाबा गायकवाड हे ज्येष्ठ नेते स्व.बाळासाहेब भिलारे यांचे मानसपुत्र म्हणून परिचित आहेत. त्यांच्या राजकीय वाटचालीवर स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्या नेतृत्वाची, शिस्तीची आणि जनतेशी नाळ जोडून ठेवण्याच्या शिकवणीची स्पष्ट छाप दिसून येते.

समाजकारणातून राजकारणात प्रवेश केलेल्या संजूबाबा गायकवाड यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून दीर्घकाळ यशस्वीपणे काम करत प्रशासकीय अनुभव आणि निर्णयक्षमता सिद्ध केली आहे. तालुका व जिल्हा पातळीवरील प्रशासनावर मजबूत पकड असलेल्या प्रशासनाशी समन्वय साधत विकासकामे राबवण्याची हातोटी त्यांच्याकडे असल्याचे समर्थकांकडून सांगितले जात आहे.

गावागावात थेट जनसंपर्क, नागरिकांच्या अडचणी समजून घेणे आणि गरज भासल्यास वेळेवर मदतीला धावून जाण्याची वृत्ती हीच संजूबाबा गायकवाड यांची खरी ओळख ठरत आहे. शेतकरी, युवक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या सहकार्याने तळदेव गटात सर्वांगीण विकास साधण्याचा ठाम निर्धार संजूबाबा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सुविधा तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे या मुद्द्यांवर त्यांचा विशेष भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खेडोपाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा संजूबाबा गायकवाड यांच्या पाठीशी उभा असून, प्रचाराला दिवसेंदिवस अधिक गती मिळत आहे. संघटनशक्ती, प्रशासकीय अनुभव आणि नेतृत्वाची परंपरा या जोरावर तळदेव गटातील ही निवडणूक लढत अधिकच चुरशीची होत चालल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले

राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात तेवत राहावी-भारत भोसले “आजच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवपिढीच्या शिलेदारांचे हस्ते प्रज्वलित करण्यात आलेली ही

Live Cricket