Home » राज्य » कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात!

कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात!

कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात!

महाबळेश्वर: तालुक्यातील कुंभरोशी गण (क्र. ६७) मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून, येथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात अटीतटीची ‘त्रिशंकू’ लढत पाहायला मिळत आहे. या लढतीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. सुरेश हरिभाऊ जाधव यांनी आपल्या सामाजिक कार्याचा धडाका आणि प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर प्रचारात आघाडी घेतली आहे.

वारसा समाजकारणाचा, अनुभव प्रशासनाचा

सुरेश जाधव यांना समाजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ जाधव यांचे ते चिरंजीव असून, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी बालपणापासूनच जनसेवेचे व्रत अंगीकारले आहे. विशेष म्हणजे, महाबळेश्वर जिल्हा परिषदेत सलग ३० वर्षे सेवा बजावून ते निवृत्त झाले आहेत. या प्रदीर्घ कालावधीमुळे त्यांना ग्रामीण भागातील समस्या आणि प्रशासकीय कामकाज यांची इत्यंभूत माहिती आहे.

संकटकाळात धावून जाणारे नेतृत्व

सुरेश जाधव यांची ओळख केवळ एक उमेदवार म्हणून नाही, तर संकटात धावून जाणारा ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून आहे. त्यांच्या कार्याचे काही प्रमुख पैलू:

पाण्याचा प्रश्न मार्गी:अतिवृष्टीमुळे गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. अशा वेळी विविध संस्थांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन त्यांनी सुमारे १ कि.मी. लांबीचे गोटा पाईप उपलब्ध करून दिले आणि गावकऱ्यांची तहान भागवली.

कामगारांना आधार: असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला. तसेच, त्यांना आवश्यक साहित्य आणि सुरक्षा किट वाटप करून त्यांच्या उपजीविकेला सुरक्षितता प्रदान केली.

▪️सहकार क्षेत्रात ठसा- ‘रामवरदायनी जंगल कामगार संस्था, पारसोंड’चे चेअरमन म्हणून त्यांनी संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

कुंभरोशी गणात रंगणार अटीतटीची लढत

कुंभरोशी गणात राजकीय पक्षांच्या प्रस्थापित उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांनीही आव्हान उभे केले असले, तरी मुख्य लढत संजय हरिश्चंद्र मोरे (शिवसेना), सचिन श्रीरंग उतेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि सुरेश हरिभाऊ जाधव (भाजप) यांच्यातच रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

सुरेश जाधव यांच्याकडे असलेला दांडगा जनसंपर्क आणि विकासकामांची ओढ पाहता, भाजपा या गणात बाजी मारणार असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. “सामान्य माणसाच्या सुख-दुखात सहभागी होणारा लोकप्रतिनिधी” अशी जाधव यांची प्रतिमा त्यांना मतदानात फायदेशीर ठरू शकते.

“प्रशासकीय कामाचा अनुभव आणि वडिलांचा समाजकारणाचा वारसा घेऊन मी कुंभरोशी गणाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. प्रत्येक नागरिकाला मूलभूत सोयीसुविधा मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे.”  — श्री. सुरेश हरिभाऊ जाधव (उमेदवार, भाजपा)

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा सातारा  प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि

Live Cricket