गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक
लिंब- गौरीशंकर च्या डॉ पी व्ही सुखात्मे इंग्लिश मिडियम स्कूल लिंब चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या विविध नृत्य व कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन फ्लाईंग एअर फोर्स ऑफिसर अजिंक्य पिसाळ या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर स्कूलचे प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण डी फार्मसी चे प्राचार्य विजय राजे पालक प्रतिनिधी जगन्नाथ शिंगटे सौ पुष्पा बागल आदी प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजिंक्य पिसाळ म्हणाले की कला क्रीडा ज्ञान व सांस्कृतिक क्षेत्रातून विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने जडणघडण होत असते. कलाविष्कारातून आपल्या अंगीभुत कौशल्याला खऱ्या अर्थाने चालना मिळत असते म्हणून जीवनात स्नेहसंमेलनाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी पंजाबी डान्स तसेच गोंधळी नृत्य व गोवा काश्मिरी बंगाली लोककलेचे अनोखे सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी वार्षिक कला क्रीडा ज्ञान व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजिंक्य पिसाळ यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य घनश्याम चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल कांबळे संस्कृती कदम हर्षदा तावरे पूजा गलांडे यांनी केले. आभार ऐश्वर्या कांबळे यांनी मानले.

वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना अजिंक्य पिसाळ समवेत नितीन मुडलगीकर श्रीरंग काटेकर घनश्याम चव्हाण विजय राजे.



