लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
महाबळेश्वर प्रतिनिधी :सातारा जिल्हा परिषद, महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव गट क्रमांक ३४ मधून भारतीय जनता पार्टीकडून श्री. सुभाष महादेव सांडकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. “लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी” या ब्रीदवाक्यासह श्री. सोंडकर हे विकासकेंद्रित आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
ग्रामीण भागातील प्रश्न, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण या विषयांवर सातत्याने काम करणारे उमेदवार म्हणून श्री. सोंडकर यांची ओळख आहे. भाजपच्या विकासाभिमुख धोरणांना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेतृत्व, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा श्री.सोंडकर यांना भक्कम पाठिंबा मिळत असून तळदेव गठात परिवर्तनाची लाट दिसून येत आहे.



