गडकोट मोहिमेसाठी धारकरी रवाना
आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांचे मार्गदर्शनाखाली गेली चाळीस वर्षे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दैदिप्यमान पराक्रमाचा,हिंदवी स्वराज्य का व कशासाठी निर्माण केले हे युवा पिढीस समजावे,समजून ते आपल्या आचरणातुन बलशाली भारत निर्माण करण्यास कारणी लागावे याच उदात्त हेतून गडकोट मोहिमेचे नियोजन केले जाते,ज्या गडकोटांवर हिंदवी स्वराज्यासाठी मावळे लढले,जिंकले त्या मातीचा सुगधं प्रत्येक युवा पिढीने आपल्या हृदयात बंदिस्त करून घेतला पाहिजे, तिथं सांडलेल्या पवित्र रक्ताचा अंश आपल्या कपाळी लावून हे हिंदवी स्वराज्य निरंतर जोपासण्यासाठीच मोहमेचा भाग असतो.
यावर्षीची चाळीसावी गडकोट मोहीम किल्ले लोहगड ते किल्ले भीमगड मार्गे एकविरा देवी,राजमाची असून दिनांक २३ जानेवारीस मोहिमेचा शुभारंभ होऊन कार्ले मार्गे भीमगडाकडे रवाना होईल.दि.२६ जानेवारी भीमगडावर मोहिमेचा समारोप होईल.
प्रत्येक मुक्कामी मान्यवरांचे व्याख्यान,गडकोट,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची तितक्याच जल्लोषात आदरणीय श्री गुरुजींच्या वाणीतून ऐकण्याची पर्वणी म्हणजे गडकोट मोहीम.नव्वदी पार केलेल्या गुरुजींच्या आदेशावर दुर्गम भागातुन चालणारी पिढी म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान.
याही वर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई तालुक्याचे वतीने जवळपास पाचशे धारकरी आज मोहिमेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले.शिवतीर्थावर एकत्रित जमून मान्यवरांचे हस्ते श्रीफळ वाढवून आजची सहावी गाडी मार्गस्थ झाली.श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पालक जेष्ठ धारकरी श्री काशिनाथ मामा शेलार,तालुका अध्यक्ष श्री किशोर भोसले,शहर अध्यक्ष श्री संदीप साळुंखे,जेष्ठ धारकरी श्री पिंटू काळे यांचे मार्गदर्शनाखाली मोहमेत सर्व धारकरी सहभागी झाले.




